सचिन वाघ आत्महत्याप्रकरणी प्राचार्या, शिक्षिकेवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

औरंगाबाद -एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात कॉपी करताना पकडलेल्या सचिन वाघ (वय 19) याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी प्राचार्या हेलन राणी व शिक्षिका रचना मोरे यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी गुन्ह्याची नोंद झाली. 

औरंगाबाद -एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात कॉपी करताना पकडलेल्या सचिन वाघ (वय 19) याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी प्राचार्या हेलन राणी व शिक्षिका रचना मोरे यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी गुन्ह्याची नोंद झाली. 

सचिनला मंगळवारी (ता. 10) सकाळी कॉपी करताना पकडले होते. यानंतर त्याने सव्वाअकराच्या सुमारास महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. यात सचिनचा आज पहाटे मृत्यू झाला. यानंतर महाविद्यालयाच्या जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी मागणी सचिनचे वडील सुरेश वाघ यांनी केली. याच मागणीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयतून सातारा पोलिस ठाण्यावर दुपारी मोर्चाही काढला. वाघ यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी याप्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्या हेलन राणी व शिक्षिका मोरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद केली. सचिनवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. 

कॉपी पकडल्यानंतर सहा महिने निलंबित करणार असल्याचे प्राचार्यांकडून सांगण्यात आले होते. अभ्यासाचे सहा महिने वाया जातील, परत शैक्षणिक शुल्क भरावे लागेल, कुटुंबीयांना हे कळल्यानंतर ते काय म्हणतील, या भीतीने सचिनने आत्महत्या केली. या प्रकरणात प्राचार्या, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 
- राहुल श्रीरामे (पोलिस उपायुक्त) 

सचिनने पहिल्यांदा कॉपी केली. यानंतर पुन्हा करणार नाही, अशी माफी त्याने मागूनही प्राचार्यांनी जुमानले नाही. महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. माझ्या लढ्यामुळे त्यांना तरी न्याय मिळेल. 
- सुरेश वाघ (सचिनचे वडील) 

Web Title: Sachin wagh suicides case teachers crime

टॅग्स