राजकीय आश्वासनं पाळली नसल्याचे दु:ख : विनायक मेटे 

Sadness of Not Following Political Assurances says Vinayak Mete
Sadness of Not Following Political Assurances says Vinayak Mete

औरंगाबाद : महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमचे काही सामाजिक प्रश्न सुटले आहेत. उर्वरित आगामी काळात सुटतील, अशी आशा आहे. मात्र, त्यांनी दिलेले राजकीय आश्वासन पाळलेले नाही, याचे आजही दु:ख आहे, अशी भावना शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्‍त केली. 

शिवसंग्रामच्या 17 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या 6 जानेवारीला येथील आमखास मैदानावर राज्यव्यापी निर्धार महामेळावा घेण्यात येणार आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी शुक्रवारी (ता.23) आयोजित पत्रकार परिषदेत मेटे म्हणाले, रायगड येथील अभिषेक करून 2002 मध्ये स्थापन केलेल्या शिवसंग्रामच्या 17 व्या वर्धापनदिनानिमित्ताने महामेळावा घेत आहोत.

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका कशी असावी, याबाबत मार्गदर्शन केले जाईल. यावेळी तान्हाजीराव शिंदे, शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे, जगन्नाथ काकडे, बाबुराव पवार, किशोर चव्हाण, सचिन मिसाळ, सलीम पटेल, लक्ष्मण नवले उपस्थित होते. 

आरक्षण नाकारणे सरकारला परवडणारे नाही

राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल सरकारने स्वीकारलेला नाही. मात्र, त्यामध्ये केलेल्या शिफारशी स्विकारल्या आहेत. त्यानुसार आरक्षण मिळविण्यास समाज पात्र झाला. त्यामुळे आरक्षण नाकारणे कुठल्याही परिस्थितीत सरकारला परवडणार नाही, असे मेटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com