esakal | परभणीत घंटानाद करुन मंदिरे उघडण्यासाठी सरकारकडे साकडे...
sakal

बोलून बातमी शोधा

PTR20A00026

परभणी जिल्हाभरातील मंदिरांसमोर भाजपसह विविध संघटनांच्या वतीने शनिवारी (ता.२९) घंटानाद आंदोलन करण्यात आले. सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत सरकारकडे मंदिरे उघडण्याची मागणी केली.    

परभणीत घंटानाद करुन मंदिरे उघडण्यासाठी सरकारकडे साकडे...

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः राज्यभरातील सर्व मंदिरे भक्तांकरिता खुली करावीत, या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषदेने पुकारलेल्या घंटानाद आंदोलनास शनिवारी (ता.२९) शहरासह जिल्ह्याभरात जोरदार प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. 

कोरोना संसर्गामुळे राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली आहेत; परंतु आता सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, भाजपच्या वतीने करण्यात आली. सर्वसामान्य भक्तगण, जनता श्रद्धेपासून वंचित आहे. सामान्य माणसांकरिता मानसिक आधार असणारी मंदिरे बंद असल्यामुळेच सर्वसामान्यांमध्ये निश्‍चितच अस्वस्थतेचे वातावरण आहे. अशा या स्थितीत राज्य सरकारने सर्व मंदिरे उघडण्याची अनुमती द्यावी, मंदिरांतून मिळणारी पवित्र ऊर्जाच कोरोनावर विजय मिळविण्याकरिता आधारभूत ठरेल, असे मत व्यक्त केले. मंदिरे भक्तांसाठी खुली न केल्यास विश्‍व हिंदू परिषदेतर्फे उग्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला. 

हेही वाचा - खासदार संजय जाधव यांचे राजीनामा अस्त्र आले कामी, मागणीला मिळाला न्याय..

परभणी शहरात ४२ ठिकाणी आंदोलन 
शहरात विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री अनंत पांडे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, लक्ष्मीकांत क्षीरसागर, जिल्हामंत्री सुनील रामपूरकर, महानगर जिल्हाध्यक्ष राजकुमार भांबरे, कार्याध्यक्ष प्रल्हादराव कानडे, अभिजित कुलकर्णी, बजरंग दलाचे देवगिरी प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे, गोपाळ रोडे, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, अभिजित कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला. ४२ मंदिरांत हे आंदोलन करण्यात आले. 

हेही वाचा - परभणी : महाबीजच्या कार्यालयावर बोगस बियाणे फेकले ; बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

पालममध्ये मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन 
पालम ः आध्यात्मिक आघाडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दुपारी अकरा वाजता घंटानाद आंदोलन करण्यात आले. श्री संत मोतीराम महाराज मंदिर, हनुमान मंदिर, राममंदिर, गणपती मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नारायण महाराज पालमकर, जिल्हा सरचिटणीस गजानन गणेशराव रोकडे, जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजीराव टोले, तालुकाध्यक्ष शिवाजीराव दिवटे, ओबीसी जिल्हाध्यक्ष भागवत बाजगीर, कानिफनाथ महाराज टाक, केशव महाराज पालमकर, पदुदेवा जोशी, शंकरशेठ कन्नावार, दिलीप रोकडे, इंद्रजित सराफ, रघू रोकडे, अमोल सुपेकर, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

शहरात विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन 
गंगाखेड ः मंदिरे सुरू करण्यात यावीत, यासाठी गंगाखेड शहरातील लेक्चर कॉलनी येथील हनुमान मंदिरासह शहरातील विविध मंदिरांसमोर भाजपच्या वतीने सकाळी ‘दार उघडा उद्धवा, दार उघडा’ असे म्हणत घंटानाद आंदोलन करण्यात आले. रामप्रभू मुंढे, तुकाराम महाराज पाटील, रमाकांत कुलकर्णी, ॲड. मंदोडे, सुनील म्हेत्रे, प्रशांत फड, पोले, बिडगर, भेंडेकर महाराज, भास्कर भिसे, अनिल मुंढे, मनोज मुरकुटे, मोहन गित्ते, जगन्नाथ आंधळे, संजय कातकडे, भागवत जलाले, योगेश ठाकूर, संतोष भोसले, सोनू फड, सतीश भोसले, सोनू पारवे, शैलेश पालटवाड, शिवराज गुट्टे उपस्थित होते. 

अंधारवाडा मारुती मंदिरात आंदोलन 
मानवत : शहरातील अंधारवाडा मारुती मंदिर या ठिकाणी शनिवारी (ता. २९) भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब जाधव, माजी तालुकाध्यक्ष अनंतराव गोलाईत, शहराध्यक्ष संदीप हंचाटे, कदम, योगेश सारडा, श्रीकांत माकुडे उपस्थित होते. देशभरातील धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

पाथरी तालुक्यात २८ धार्मिक स्थळांवर घंटानाद 
पाथरी ः राज्यातील मंदिरे सुरू करावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुक्यातील २८ विविध धार्मिक स्थळांवर घंटानाद आंदोलन करण्यात आले. पाथरीत साई मंदिर, शिक्षक कॉलनी हनुमान मंदिर, रामपुरी येथे रत्नेश्वर मंदिर, सिमूरगव्हाण, गुंज खुर्द येथील दत्त संस्थान, मुदगल, कासापुरी, बोरगाव, विटा, बाभळगाव येथे ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी उपजिल्हाध्यक्ष डॉ. उमेश देशमुख, बाळासाहेब जाधव, बाबासाहेब जामगे, उद्धव वाईक, शिवराज नाईक, सुभाष आंबट, अनंत गोलाईत, अरुण वडकर, दादाराव रासवे, संतोष जोगदंड, सोहम घाटूळ, वैभव गवारे, गजानन लुचारे, रमेश सोनटक्के, शिवाजी गलबे उपस्थित होते.  

संपादन ः राजन मंगरुळकर