रंग रेषांच्या भावविश्वात रंगले चिमुकले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

सेलू येथील एका सेंटर वर परभणी चे खासदार संजय जाधव यांनी जाऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शहरातील शाळांना अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. अनेक शाळांनी स्पर्धला येणाऱ्या विदयार्थ्यांना चॉकलेट चे ही वाटप केले.

परभणी : जगातील सर्वात मोठ्या चित्रकला स्पर्धेला परभणी जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील 32 सेंटर वर हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुंचल्यातून भावविश्व रेखाटले.

बोचऱ्या थंडीत सकाळी सकाळ चित्रकला स्पर्धेला सुरुवात झाली. परभणी शहरातील 9 सेंटर व 23 सेंटर वर ही स्पर्धा दोन सत्रात झाली. तीन पिढ्याला जोडणारी ही एकमेव स्पर्धा असल्याने पालकांची उत्सुकता मोठी दिसत होती. पाल्या सोबत त्यांचे वडील, आई इतकेच काय तर आजोबा आजी देखील सेंटरवर दिसत होते.

सेलू येथील एका सेंटर वर परभणी चे खासदार संजय जाधव यांनी जाऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शहरातील शाळांना अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. अनेक शाळांनी स्पर्धला येणाऱ्या विदयार्थ्यांना चॉकलेट चे ही वाटप केले.

Web Title: Sakal Drawing competition in Parbhani