‘सकाळ-मधुरांगण’ शॉपिंग उत्सवाला गर्दी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

उत्सवाचा आज शेवटचा दिवस; मकरसंक्रांतीनिमित्त खरेदीची महिलांना संधी  
लातूर - ‘सकाळ-मधुरांगण’च्या वतीने नवीन वर्षप्रारंभ व मकरसंक्रांतीनिमित्त औसा रोडवरील पारिजात मंगल कार्यालयात सुरू असलेल्या ‘मधुरांगण शॉपिंग उत्सव २०१७’ला शहरातील महिला भरभरून प्रतिसाद देत आहेत. या उत्सवातून खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली असून उत्सवाचा रविवारी (ता. आठ) शेवटचा दिवस आहे.

उत्सवाचा आज शेवटचा दिवस; मकरसंक्रांतीनिमित्त खरेदीची महिलांना संधी  
लातूर - ‘सकाळ-मधुरांगण’च्या वतीने नवीन वर्षप्रारंभ व मकरसंक्रांतीनिमित्त औसा रोडवरील पारिजात मंगल कार्यालयात सुरू असलेल्या ‘मधुरांगण शॉपिंग उत्सव २०१७’ला शहरातील महिला भरभरून प्रतिसाद देत आहेत. या उत्सवातून खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली असून उत्सवाचा रविवारी (ता. आठ) शेवटचा दिवस आहे.

प्रचीती कॉम्प्युटर्स हे या उत्सवाचे मुख्य प्रायोजक असून नव्व्या डिझायनर स्टुडिओ व ॲन आर्ट पेटिंग क्‍लासेस हे सहप्रायोजक आहेत. उत्सवाला शुक्रवारी (ता. सहा) थाटात प्रारंभ झाल्यानंतर रात्रीपासूनच महिलांनी उत्सवाला भेट देण्यास सुरवात केली. उत्सव सुरू झाल्याची माहिती ‘सकाळ’मधून मिळाल्यानंतर शनिवारी (ता. सात) महिलांच्या गर्दीत वाढ झाली. उत्सवात साडी, इमिटेशन ज्वेलरी, शोपीस, लेडीज स्टॉक, संक्रांतीच्या वाणवस्तू, नमकीन स्वीटस्‌, मसाले, गृहोपयोगी वस्तू, ड्रेस मटेरियल, बांगड्या, फुलझाडे, मातीची भांडी, गुजरात शो पीस, लेडीज बॅग, क्रिस्टल माळा, कच्ची ड्रेस आदीसह दैनंदिन वापरातील वस्तू तसेच महिला गृहउद्योगांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची जोरदार विक्री सुरू आहे. महिलांना त्यांच्या पसंतीच्या वस्तू उत्सवाच्या निमित्ताने एकाच छताखाली मिळत असल्याने त्यांचा ओढा वाढला आहे. या उत्सवात ‘मधुरांगण’च्या सदस्यांना व्यावसायिक संधी देण्यात आली आहे. उत्सवाचा रविवारी शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवशीही महिलांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता गृहीत धरून उत्सवातील स्टॉलधारकांनी जय्यत तयारी केली आहे.

स्टॉलधारकांचा गेम शो
उत्सवात सहभागी स्टॉलधारकांतर्फे खरेदीला आलेल्या महिलांसाठी शनिवारी वन मिनीट गेम शो घेण्यात आला. विजेत्या आशा सांगवीकर, अर्चना हावळे, कल्पना भोजवीया व सारीका बोराळे यांना महाराष्ट्र चहा व व्हीएनस स्नॅक्‍सतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. या शोमध्ये सहभागी महिलांना व्हीनस स्नॅक्‍स स्पायसेस, दिशा एंटरप्रायजेस (सुपर स्टॉकिस्ट) ॲन्ड साई एजन्सीज डिस्ट्रीब्युटर यांच्यातर्फे नमकीन्स, सोनपापडी, स्पायसेस, चिक्की आदी भेटवस्तू देण्यात आल्या. रविवारी सकाळी अकरा ते दोन या वेळेत हलवा दागिने (मुकूट, कमरपट्टा, बाजूबंद, बांगड्या व हार) तयार करण्याची स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्यांना मोकमे ग्रोवटतर्फे बक्षीसे देण्यात येणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता समई डेकोरेशन स्पर्धा होणार आहे. यात महिलांनी भाग घ्यावा, असे आवाहन संयोजिका उर्मिला उरणे व अमीता वैद्य यांनी केले आहे.

Web Title: sakal-madhurangan shopping utsav