औरंगाबामध्ये योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

सहारनपुर उत्तरप्रदेशात दलितांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार, हत्याकांड, जाळपोळचा बहुजन रिपब्किलन सोशालिस्ट पार्टी (पीआरएसपी)ने निषेध करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा रविवार (ता.28) औरंगाबादेतील क्रांती चौकात पुतळा जाळला. 

औरंगाबाद- सहारनपुर उत्तरप्रदेशात दलितांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार, हत्याकांड, जाळपोळचा बहुजन रिपब्किलन सोशालिस्ट पार्टी (पीआरएसपी)ने निषेध करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा रविवार (ता.28) औरंगाबादेतील क्रांती चौकात पुतळा जाळला. 

मागील काही दिवसांपासून सहारनपुर येथे दलित समाजावर अत्याचार झाला आहे. यामध्ये अनेकांचे घरे जाळण्यात आली. काही जणांचे खुन झाले. यामध्ये दलित समाजातील अनेक लोक बेघर झाले आहे. याचा निषेध करत बीआरएसपी ने निदर्शने करुन योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे, राज हिरे, राहुल भिंगारे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: sakal news breaking news aurangabad news protest against yogi adityanath