Dharashiv News: साकत-अंतरगाव परिसरात भीषण आग; २०० एकरांवरील ऊस जळून खाक, ७० ते ८० शेतकऱ्यांचे नुकसान!

Massive Fire Destroys 200 Acres of Sugarcane in Paranda: २०० एकरांवरील ऊस जळून खाक! साकत-अंतरगावमध्ये आगीचा भडका; ७० ते ८० शेतकऱ्यांचे नुकसान
Paranda Sugarcane Fire Destroys 200 Acres of Crops as Strong Winds Spread Flames Across Farms in Sakhat Village

Paranda Sugarcane Fire Destroys 200 Acres of Crops as Strong Winds Spread Flames Across Farms in Sakhat Village

esakal

Updated on: 

-धनंजय शेटे

भूम : भूम तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या परंडा तालुक्यातील साकत व अंतरगाव परिसरात दुपारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत २०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. या आगीत अंदाजे ७० ते ८० शेतकऱ्यांचे ऊस पीक पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून केळीच्या बागा, ठिबक सिंचन संच, विहिरीवरील सौरऊर्जा यंत्रणा, पाईप, मोटारी यांसह शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

Loading content, please wait...