उकाडा वाढल्याने कूलरची विक्री तेजीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

औरंगाबाद - उन्हाच्या चटक्‍याने अंगाची लाहीलाही होत असल्याने, तसेच रात्रीसुद्धा असह्य उकाडा वाढल्याने आठवडाभरात कूलरच्या विक्रीत अनेक पटींनी वाढ झाली आहे. सध्या औरंगाबाद शहरातील कूलरच्या मार्केटमध्ये खरेदी, दुरुस्तीसाठी झुंबड उडत आहे. कूलरच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत वाढ झालेली असली तरी उन्हामुळे विक्री जोरदार होत आहे. 

मागील आठवड्यापासून तापमान वाढते आहे. उकाड्यात फॅनपासून दिलासा मिळत नसल्याने अनेकांची पावले कूलर खरेदीकडे वळत आहे. फॅन कितीही "स्पीड'वर ठेवला तरीही घामाच्या धारा लागतात. या उकाड्यापासून वाचण्यासाठी आणि गारव्याचा आनंद घेण्यासाठी शहरवासीयांची कूलर खरेदीवर उडी पडली आहे. उन्हाची परवा न करता भरदुपारी कूलर खरेदी करताना नागरिक दिसत आहेत. 

डेझर्ट विंडो कूलरला मागणी जास्त 

शहरवासीयांकडून डेझर्ट विंडो कूलरला जास्त मागणी असून हे कूलर खिडकीला बाहेरू लावून ठेवले की, जास्त प्रमाणात थंड हवा देते. त्यामुळे याला मागणी जास्त आहे. नोटबंदी आणि कूलरचे साहित्य महाग झाल्याने कूलरच्या किमतीत वाढ झालेली आहे. सध्या कूलर 1600 ते 5 हजार रुपयांपर्यंत आहे. यामध्ये 2 फूट ते चार फुटांपर्यंत कूलर विक्रीस आहे. घराचा आकार छोटा असल्याने तसेच, कमी जागा जावी यासाठी 2 ते 3 फुटांच्या कूलरची सर्वाधिक विक्री आहे. फायबर कूलरपेक्षा, डेझर्ट कुल स्वस्तात मस्त आणि जास्त गारवा देणारे असल्याने यालाच सर्वाधिक मागणी असल्याची माहिती विक्रेते सय्यद अजीम यांनी दिली. 

सायंकाळनंतर खरेदीसाठी गर्दी 
शहरातील अंगुरीबाग रविवार बाजाराजवळ येथील कूलर मार्केटमध्ये गर्दी वाढली आहे. सायंकाळनंतर बाजारातील सर्वच दुकानांवर मोठी गर्दी असते. या शिवाय शहरातील बाहेरील विक्रेतेसुद्धा येथून कूलर विक्रीसाठी घेऊन जातात. या ठिकाणी ऑर्डर देऊनसुद्धा कूलर तयार करता येत असल्याने येथे रात्रीच्या वेळेस जास्त गर्दी असते. 

Web Title: sales of coolers

टॅग्स