दानवेंच्या घरात साप सोडण्याचा इशारा देणाऱ्यांचा मराठा समाजासोबत संबध नाही- मनोज आखरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

जालन्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरात ज्या लोकांनी साप सोडण्याचा इशारा दिला होता, त्या लोकांचा मराठा समाजाची काही संबंध नसून सरकारनेच मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केला आहे.

भोकरदन - जालन्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरात ज्या लोकांनी साप सोडण्याचा इशारा दिला होता, त्या लोकांचा मराठा समाजाची काही संबंध नसून सरकारनेच मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केला आहे.

त्याचबरोबर ते म्हणाले की, या अगोदर देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीमध्ये मराठा आंदोलक साप सोडणार असल्याचे सांगितले होते, आता देखील सरकारचाच दानवेंच्या घरात साप सोडण्याचा कट असू शकतो असेही ते म्हणाले.

Web Title: sambhaji brigede state president manoj akhare criticise on government