राष्ट्रवाद हिच पहिली निष्ठा : निलंगेकर

Sambhaji Nilangekar
Sambhaji Nilangekar

लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे सामाजिक एकता निर्माण झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवून ही एकता आणखी मजबूत केली आहे. सर्वांनी देशाप्रती प्रेम व सदभावना कायम ठेवली तरच देशाची एकता वाढीस लागेल. राष्ट्रध्वजाकडे पाहिल्यानंतर राष्ट्रभक्ती व राष्ट्रवाद जागृत होते. राष्ट्रवाद हिच पहिली निष्ठा असून सर्व युवकांनी ती पावलापावलावर जोपासावी, असा भावनिक सल्ला राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला. 

निलंगा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बारा फुट उंच पुर्णाकृती पुतळा व 105 फुट उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणप्रसंगी बुधवारी (ता. 11) ते बोलत होते. खासदार सुधाकर श्रृंगारे अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, गोदावरी खोरो विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ निडवदे यांच्यासह भंते व पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. निलंगेकर म्हणाले, ``देशाप्रती प्रेम ठेवत स्वतः मिळवलेल्या गोष्टीचा उपयोग देशाला करून द्या. तंत्रज्ञानाचा वापर देशसेवेसाठी करा. नकारात्मक बाळगू नका. तुमचे सर्व स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण होणार आहे. आयुष्याच्या वाटचालीत देशाचे स्थान नेहमी ह्रदयात ठेवावा.

संविधानामुळे समाजातील प्रत्येक घटक एका विचाराने रहातो. हा एकतेचा विचार टिकवून ठेवून वृद्धींगत करण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यायला हवा.`` डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला महत्व दिले. यामुळे युवकांनी शिक्षणाची ओढ कायम ठेऊन आंबेडकर यांच्या विचाराचे खरे पाईक व्हावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी व्यक्त केली. या वेळी पालकमंत्र्यांनी सर्वांना संविधानाची शपथ दिली. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या टोप्यांमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी तिरंगा ध्वजाचा लहर उमटली आणि उपस्थितात देशभक्तीचे वातावरण तयार झाले. 

देशातील सर्वात मोठा पुतळा
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा व 105 फुट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे एकाचवेळी होणारे लोकार्पण हा निलंग्यातील नागरिकांसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे पालकमंत्री निलंगेकर म्हणाले. देशातील सर्व `क` वर्ग नगरपालिकांच्या क्षेत्रातील आंबेडकर यांचा निलंग्यातील सर्वात मोठा पुर्णाकृती पुतळा असून यानिमित्ताने निलंग्यात लवकरच डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरवात होत असल्याचेही त्यांनी सांगितले. एक हजार सातशे किलो वजनाचा डॉ. आंबेडकर यांचा हा पुतळा निलंग्यासाठी स्टॅच्यू ऑफ ईकव्हॅलिटी असल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे म्हणाले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com