मी सध्या लातूरकरांसारखाच वागतोय...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

लातूर - लातूर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांनी गेल्या काही दिवसांपासून बंडाची भूमिका घेतली आहे. हे बंड थंड झाले आहे. बंड करणे हे लोकशाहीचे लक्षण आहे; पण त्याचा अतिरेक होऊ नये. सध्या मी लातूरकरांसारखाच वागत आहे. निलंग्यासारखी भूमिका घेतलेली नाही, असे म्हणत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बंड करणाऱ्या नगरसेवकांना एक प्रकारे इशाराच दिला आहे. 

लातूर - लातूर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांनी गेल्या काही दिवसांपासून बंडाची भूमिका घेतली आहे. हे बंड थंड झाले आहे. बंड करणे हे लोकशाहीचे लक्षण आहे; पण त्याचा अतिरेक होऊ नये. सध्या मी लातूरकरांसारखाच वागत आहे. निलंग्यासारखी भूमिका घेतलेली नाही, असे म्हणत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बंड करणाऱ्या नगरसेवकांना एक प्रकारे इशाराच दिला आहे. 

येथील महापालिकेच्या वतीने तीन नवीन सीटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचे उद्‌घाटन पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ७) झाले. यावेळी श्री. निलंगेकर यांनी स्वतः सीटी बस चालवली. यावेळी महापौर सुरेश पवार, आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, अपर पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, भाजपचे शहराध्यक्ष शैलेश लाहोटी, नगरसेवक शैलेश स्वामी, संगीत रंदाळे, सुनील मलवाड आदी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या झालेल्या स्थायी समितीची सभा व सर्वसाधारण सभेवर सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. या बहिष्काराला महापौरावरील नाराजी, स्थायी समिती सभापतीवरील नाराजी, अर्थकारण असे वेगवेगळे पदर होते. यात महापालिकेपेक्षा पक्षाचीच बदनामी अधिक झाली. हे लक्षात आल्यानंतर श्री. निलंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी सर्व नगरसेवकांची हजेरी घेतली होती. यात मंगळवारी श्री. निलंगेकर यांच्या हस्ते महापालिकेत सीटी बसचे उद्‌घाटन झाले. 

नगरसेवकांचा अघोषित बहिष्कार 
पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते आज सीटी बसचे उद्‌घाटन होते. यावेळी सत्ताधारी ३९ नगरसेवकांनी उपस्थितीत राहणे अपेक्षित होते; पण यात सुमारे तीस नगरसेवक गैरहजर राहिले. यात उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापतींचाही समावेश होता. त्यामुळे नगरसेवकांत अजूनही खदखद सुरूच आहे, असे स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे विरोधक असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्यविकास प्रशिक्षण
राज्यातील शेतकऱ्यांच्या तीन लाख मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातील ८० टक्के शेतकरी हे मराठा समाजातील आहेत. या समाजाच्या वीस मागण्यांवर शासनाने कार्यवाही सुरू केलेली आहे. त्यातील महत्त्वाच्या मागणीत शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत व वसतिगृहाची आहे. या संबंधीचे आदेशही शासनाने काढलेले आहेत. लातुरात ता. २९ ऑगस्टपर्यंत मराठा समाजातील मुलामुलींसाठी प्रत्येकी शंभर क्षमतेचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार कल्याण व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Web Title: sambhaji patil Nilangekar latur