esakal | मराठवाडाविरोधी सरकारची नौटंकी करू बंद, संभाजी निलंगेकरांचा इशारा | Sambhaji Patil Nilangekar
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji nilangekar news

मराठवाडाविरोधी सरकारची नौटंकी करू बंद, संभाजी निलंगेकरांचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : जगाचा पोशिंदा असलेल्या बळिराजाला न्याय देण्यासाठी, त्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांसोबत अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. मात्र या आंदोलनास ‘नौटंकी’ असे संबोधून सत्ताधारी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोचविण्याचे काम करीत आहेत. याच शेतकऱ्यांचा स्वाभिमानाला उंचावण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी आगामी काळात मराठवाडाविरोधी (Marathwada) सरकारची नौटंकी बंद करू, असा इशारा माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी दिला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट मदत करावी या मागणीसाठी येथे निलंगेकर यांच्या (Latur) नेतृत्वाखाली कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी मंगळवारी (ता.१२) ते बोलत होते.

हेही वाचा: भागवत कराड डॉक्टर असले, तरी मी आई आहे! पंकजा मुंडेंचा टोला

खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अन्नत्याग आंदोलन आहे. त्याची खिल्ली उडविणाऱ्या मराठवाडाविरोधी सरकारसह सत्ताधारी पक्षांची सुरू असलेली नौटंकी आगामी काळात बंद पाडू, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा निलंगेकरांनी दिला. दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा दर्शवत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मुंडण केले.

loading image
go to top