प्रतिबंधक लस घेतली का? काय म्हणते तब्येत! अशी विचारपूस करत निलंगेकरांनी कोरोना केंद्राला दिली भेट

राम काळगे 
Thursday, 28 January 2021

शहरातील उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे  २५ जानेवारीपासून तालुक्यातील शासकीय व खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोवीड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

निलंगा (जि.लातूर) : कोरोना प्रतिबंधक लस घेतली का? काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका! अशी विचारपूस निलंगा येथील कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट घेत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बुधवारी (ता.२७) केली. शहरातील उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे  २५ जानेवारीपासून तालुक्यातील शासकीय व खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोवीड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे तालुक्यातील शासकीय व खासगी क्षेत्रातील जवळपास चौदाशे आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे.

न थांबता सलग चोवीस तास सादर केली मराठमोळी लावणी, लातूरच्या कन्येने रचला इतिहास

येथील उपजिल्हा रुग्णालय येथे ८०० कर्मचाऱ्यांची नोंद झाली असून ग्रामीण रुग्णालय कासारशिरसी येथे  ६०० कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. दररोज १२० कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची  नेमणूक करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली असून दुसऱ्‍या टप्प्यात महसूल, पोलिस व तत्सम कर्मचारी व अधिकाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील सर्व नागरिक व ५० वर्षांखालील सहव्याधी असलेल्या जनतेला लसीकरण करण्याचे  नियोजन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत अनेक संभ्रम निर्माण होत असून काही ठिकाणी या लसीबाबत विपरीत परिणाम दिसून येत आहेत. 

अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघड, नवरदेवाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या कक्षाला भेट दिली. याप्रसंगी निलंगेकर म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस घेतली का? काय म्हणते तब्येत..बरी आहे ना..चिंता करू नका... तुमच्यामुळे तर आजपर्यंत नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले आहे. तुम्ही लस घेतली आहे. लवकर बरे व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप सौंदळे, डॉक्टर पी. टी. सोळूंके यासह कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान सध्या निलंगा येथील उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार गणेश जाधव हे दोन्ही वरिष्ठ आधिकारी कोरोनाबाधित झाले असून तहसीलदार गणेश जाधव हे निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Patil Nilangekar Visits Corona Center Nilanga Latur Latest News