

BJP youth leader found dead
Esakal
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी असलेले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह नारावाडी शिवारात आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हैद्राबाद-नारवाडी मार्गावरील नारावाडी शिवारात, नळकांडी पुलाजवळ हा मृतदेह सापडला. टेमकर यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.