"त्या' मायलेकरांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

अंबाजोगाई - औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले उपअभियंता दिलीप सोपान घाडगे (वय 52) यांचे सोमवारी (ता. 14) एरंडोलजवळ कारअपघातात निधन झाले. काही कालावधीत उपचार सुरू असताना त्यांच्या आईचेही निधन झाले. मंगळवारी (ता. 15) या दोघा माय -लेकराच्या पार्थिवावर दस्तगीरवाडी (ता. अंबाजोगाई) येथे एकाचवेळी अंत्यसंस्कार झाले. 

तालुक्‍यातील दस्तगीरवाडी येथील मूळ रहिवासी व सध्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले दिलीप घाडगे हे पत्नी, आईसह कारमध्ये माउंट अबू येथे जात होते. सोमवारी सकाळी त्यांची कार व बसचा अपघात झाला. त्यात दिलीप घाडगे हे जागीच ठार झाले. त्यांची पत्नी, आई, इतर एक महिला व चालक जखमी झाले होते; परंतु काही कालावधीत उपचार सुरू असतानाच त्यांची आई सत्यभामा घाडगे यांचाही मृत्यू झाला. मंगळवारी या दोघांचेही पार्थिव त्यांच्या गावी दस्तगीरवाडी येथे आणण्यात आले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर एकाचवेळी अंत्यसंस्कार झाले. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. दिलीप घाडगे हे सटाणा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता होते. मुंबई महानगर पालिकेतील उपअभियंता नवनाथ घाडगे यांचे ते बंधू होत. 

Web Title: at the same time on the mother son Funeral