

शिवाजी आस्वार, माळीवाडा : समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये टाकळीवाडी शिवारात (ता. गंगापूर) इंटरचेंजपासून दोन किलोमीटर अंतरावर शनिवारी (ता. २६) सकाळी साडेअकराला भीषण अपघात झाला. नाशिकहून जालन्याकडे जाणाऱ्या महिंद्रा एक्सयूव्ही कारने पुढे जात असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई-वडील आणि दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.