

Maharashtra Samruddhi Expressway Accident Leaves One Dead And 10 Seriously Injured After Travel Bus Hits Container Truck
esakal
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय ६५, रा. वैजापूर) यांचा मृत्यू झाला, तर ट्रॅव्हल्समधील १० प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातात अन्य प्रवाशांनाही दुखापत झाल्याची माहिती आहे.