Accident : समृद्धी महामार्गावर कार व कंटेनरच्या अपघातात तीन ठार, दोन जखमी

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असलेल्या भाविकांचा समृद्धी महामार्गावर कार व कंटेनरच्या अपघातात तीन जण ठार.
Accident
Accidentsakal

छत्रपती संभाजीनगर/वैजापूर - साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असलेल्या भाविकांचा समृद्धी महामार्गावर कार व कंटेनरच्या अपघातात तीन जण ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.९) रात्री साडेअकराच्या सुमारास वैजापूर-कोपरगाव सीमेवरील धोत्रे शिवारात घडली.

राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे (तिघेही रा. जाफराबाद, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात फलके व वाघ हे दोघे जखमी झाले असून त्यांची पूर्ण नावे कळू शकली नाहीत. त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

या घटनेविषयी अधिक माहिती अशी ः वैजापूर-कोपरगाव सीमेच्या परिसरात असलेल्या तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावर एक कंटेनर उभा होता. त्यातील चॅनल खाली पडलेला होता. हा चॅनल कंटेनर चालक उचलत असताना जालन्याकडून शिर्डीकडे कार भरधाव वेगाने येत होती. या कार चालकाचा ताबा सुटल्याने समोर असलेल्या कंटेनर चालकाला धडक देत ही कार समोरील कंटेनरवर जाऊन जोरात आदळली.

या भीषण अपघातात वरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात कार चक्काचूर झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com