

Samruddhi Expressway Accident Bus Hits Divider Near Sawangi Two Dead 30 Injured Four Passengers in Critical Condition
esakal
फुलंब्री : समृद्धी महामार्गावर सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक ४२६ येथे सोमवारी (ता. २३) पहाटे दीड वाजेच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव बस चालकाला डुलकी लागल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.