खान चाहिये ना बाण चाहिये : जिग्नेश मेवानी

मेवानी
मेवानी

परभणी - 'ना खान चाहिये ना बाण चाहिये, हमको अपना जीवन छान चाहिये', अशा पंक्ती सादर करीत आमदार जिग्नेश मेवानी यांनी परभणी जिल्ह्यातील खान-बाणच्या राजनीतीकडे लक्ष वेधले. विशेषतः ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हिंदू-मुस्लिमांचे, असे धृवियीकरण होते. ते थांबवून समाजाला तोडण्याऐवजी जोडण्याची विचारधारा सांगण्यासाठी मी गुजरातहून देशभरात जाणार असल्याचे श्री. मेवानी यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार मेवानी यांची संविधान सन्मान यात्रा आज (ता.२७) परभणीत आली आहे. यानिमित्त त्यांनी शहरातील बी. रघुनाथ सभागृहात दुपारी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, "पंतप्रधानाची ५६ इंचची छाती असताना देशात शेतकरी आत्महत्या, संविधानाची तोडफोड, बेकारी, बेरोजगारी, मंदी कशी येते. त्याविरूद्ध विरोधी पक्ष देखील बोलण्यास तयार नाही. म्हणजे देशभरात राजकीय निष्क्रीयता आली आहे. आता लोकांनीच विरोधी पक्षाची भूमिका बजवायला पाहिजे. त्यात गतिशीलता आणण्यासाठी दलित अधिकार मंच स्थापन करण्यात आला आहे. तो देशातील प्रत्येक जिल्ह्यात जाणार असून, त्यातील संघटन निवळ दलितांचे नसून सर्वांचा समावेश त्यात राहील. ते संविधान विरोधी भाजापला पराजित करण्यासाठी समाजात जागृती करेल. सध्या देशात मनुस्मृतीची व्यवस्था कायम करण्याचे आदेश नागपुरातून भाजपाला दिले जातात. त्याप्रमाणे संविधान तोडून मनुस्मृती पुढे आणण्याचे काम भाजप करीत आहे. आजघडीला देशात सर्व थरातून इव्हीएमवर शंका घेतली जात आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात शंका नाही, तर बॅलेट पेपरवर का निवडणूका घेत नाहीत. मी जिंकूनही बॅलेट पेपरवरील निवडणुका घेण्याला पसंती देईल", असे श्री. मेवानी यांनी म्हटले आहे. मंचचे जिल्हाध्यक्ष रवि सोनकांबळे, नगरसेवक नागेश सोनपसारे यावेळी उपस्थित होते.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com