esakal | काहीही! हा साप खरंच पाडतो का पैशाचा पाऊस... जाल खडी फोडायला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ही कारवाई आसना नदी परिसरात असलेल्या एका गुरूद्वाराजवळ मंगळवारी (ता. १८) दुपारी केली. घटनास्थळावरून पोलिस दिसताच दोघेजण पसार झाले. याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काहीही! हा साप खरंच पाडतो का पैशाचा पाऊस... जाल खडी फोडायला

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड :  मांडूळ विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेचार लाखाचे तीन मांडूळ जप्त केले. ही कारवाई आसना नदी परिसरात असलेल्या एका गुरूद्वाराजवळ मंगळवारी (ता. १८) दुपारी केली. घटनास्थळावरून पोलिस दिसताच दोघेजण पसार झाले. याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मांडूळ ही सापाची जात असून ती गुप्तधन व पैशाचा पाऊस पाडण्याचे काही मोठे श्रीमंत व्यक्ती विकत घेत असतात. त्या व्यक्तींना ही टोळी आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखोंची माया जमा करतात. एक मांडूळ कमीतकमी एक लाखाच्यावर विक्री केल्या जाते.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

ही टोळी अर्धापूर व नांदेड शहरात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली. त्यांनी अधीकृत माहिती घेऊन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना सांगितले. 

हेही वाचा ढोक महाराजांचं शेतकऱ्यांबद्दल मोठं वक्तव्य : म्हणाले, आत्महत्या...

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. चिखलीकर यांनी सहय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्या पथकाला गुप्त माहितीवरून सापळा लावण्याचे सांगितले. श्री. मांजरमकर यांनी मंगळवारी (ता. १८) आसना बायपास परिसरात असलेल्या गुरुद्वाराजवळ सापळा लावला. यावेळी मांडूळ विक्री करण्यासाठी आलेल्या चार मांडूळ तस्करांना ताब्यात घेतले.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

त्यांच्याकडून तीन मांडूळ जप्त केले. यात एकाचे वजन सव्वादोन किलो, दुसरा एक किलो ९०० ग्राम आणि तिसरा एक किलो असे मांडूळ जप्त केले. या मांडूळाची किंमत अंदाजे बाजारात साडेचार लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

मांडूळ तस्करांना अटक

या मांडूळाबाबत ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे विचारणा केली असतात्या मांडूळांना डब्बल इंजीन, जब्बल मुव्हमेंट या नावाने ओळखल्या जाते. वन्य जीव प्राण्याची तस्करी करणारी टोळी पोलिसांनी अटक केली.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

अटक केलेल्यात भिमराव उर्फ संतोष पुजाराम बिऱ्हाडे (वय २९) रा. कारला (ता. हिमायतनगर) ह.मु. छत्रपती नगर रांजनगाव (शेनपुजी) ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद, शेख सलमान शेख आजीम (वय २४) रा. टाटीगुडा, साईबाबा मंदीराजवळ वार्ड -२३, अदिलाबाद (तेलंगना), सय्यद मुसा सय्यद ईसुफ (वय ४२) रा. सय्यद किराणा व घरकुल बिल्डींग जवळ तेहरानगर, नांदेड आणि अजमतखान समंदरखान पठाण (वय ५०) रा. माजलगाव जिल्हा बीड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन मांडूळ जप्त केले. जप्त केलेले तीन्ही जीवंत मांडूळ योग्य ती कार्यवाही करून वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदेड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. 

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्यात घरफोडींचे सत्र सुरूच

पथकातील हे आहेत पोलिस 

या कार्यवाहीसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर, सुनील नाईक, फौजदार प्रविण राठोड, सहाय्यक फौजदार श्री. चव्हाण, हवालदार भानुदास वडजे, मारोती तेलंग,  दिनानाथ शइंदे, दशरथ जांभळीकर, विष्णु इंगळे, तानाजी येळगे, देवा चव्हाण, बजरंग बोडके, विलास कदम, राजू पुलेवार यांनी परिश्रम घेतले. 

Sand Boa Snake Smuggling Gang Arrested By Nanded Police