चंदन तस्करांची टोळी नांदेडमध्ये जेरबंद 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 22 जानेवारी 2019

नांदेड : हैद्राबादकडे एका महिंद्रा पीक गाडीतून जाणारे नऊ लाख ३० हजाराचे साडेचारशे क्विंटल चंदन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पाठलाग करून जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (ता. 22) पहाटे पाच वाजता मारतळा शिवारात केली. यवेळी दोन चंदन तस्कारांना अटक केली.

नांदेड : हैद्राबादकडे एका महिंद्रा पीक गाडीतून जाणारे नऊ लाख ३० हजाराचे साडेचारशे क्विंटल चंदन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पाठलाग करून जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (ता. 22) पहाटे पाच वाजता मारतळा शिवारात केली. यवेळी दोन चंदन तस्कारांना अटक केली.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या पांगरा (शिंदे) शिवारातून हैद्राबादकडे एका गाडीतून चंदन जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांना मिळाली. त्यांनी पोलिस अधिक्षक संजय जाधव आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना देऊन भोकर फाटा येथे फौजदार सहदेव खेडकर आणि चंदासिंग कॉर्नर येथे फौजदार कल्याण नेहरकर यांचे पथक तैनात केले. परंतु चंदन घेऊन जाणारी गाडी ही मालेगाव मार्गे नांदेड शहरातून वसरणी ते चंदासिंग कॉर्नर येथे पोहचली. यावेळी तेथे तैनात असलेले फौजदार नेहरकर यांच्या पथकांनी संशयावरून महिंद्रा पीकअप (केए- 18-4501) थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकांनी आपली गाडी सुसाट वेगाने नायगावकडे नेली. पोलिसांनी त्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करत मारतळा जवळ गाडीला अडविले. चालक महमद हमद खूनी म. सोफी (वय 32, रा. कर्नाटक) आणि चंदन तस्कर शेख अली शेख खाजा (वय 45, रा. कुरूंदा ता. वसमत) या दोघांना ताब्यात घेतले.

गाडी पाहिली तर पुर्ण रिकामी दिसत होती. कोणालाच काही संशय येत नव्हता. पंरतु पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता एक फुट खोल खड्डा करून त्यात चंदन ठेवल्याचे आढळून आले. तब्बल 460 किलोग्राम वजनाचे लाकडी तुकडे जप्त केले. मंगळवारी सकाळी उस्माननगर पोलिस ठाण्यात चंदनासह महिंद्रा पीक लावून फौजदार कल्याण नेहरकर यांच्या फिर्यादीवरुन वरील दोन चंदन तस्कारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: sandal smuggler caught by police