'बदलत्या काळाची पावले ओळखण्याची दृष्टी पवार साहेबांकडे'

युवराज धोतरे
Sunday, 13 December 2020

राज्यमंत्री श्री बनसोडे म्हणाले, उदगीरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे कार्य चालू असून महत्त्वाचे व मोठे प्रश्न सोडविले आहेत.

उदगीर: सर्वांना घेऊन चालण्याचे कौशल्य व दृष्टी शरदचंद्र पवार यांच्याकडे आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरदचंद्रजी पवार नेञ रुग्णालयातील धर्मशाळेचे भुमीपूजन ही बाब त्यांच्या सामाजिक लौकिकाला साजेशी आहे, असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांनी केले.

'बदलत्या काळाची पावले ओळखण्याची दृष्टी पवार साहेबांकडे असल्याचे मत मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं. उदगीर येथील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या शरदचंद्रजी पवार नेत्ररुग्ण धर्मशाळेच्या भुमीपुजनाच्या व बारा बलुतेदार कामगारांची नेत्रतपासणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्षस्थानी होते. व्यासपिठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रा.डॉ .शिवाजी मुळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, माजी उपसभापती बाबासाहेब काळे, लाॕयन्स नेत्ररूग्णालयाचे अध्यक्ष डॉ .रामप्रसाद लखोटिया, सचिव प्रदीप बेद्रे उपस्थित होते.

परिस्थितीवर मात करत अखेर चारही बहिणी होणार डॉक्टर

यावेळी राज्यमंत्री श्री बनसोडे म्हणाले, उदगीरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे कार्य चालू असून महत्त्वाचे व मोठे प्रश्न सोडविले आहेत. उदगीर मतदारसंघाचा कायापालट होण्यासाठी सातत्याने कार्यरत असून मतदारसंघातील रस्ते व मोठमोठी विकास कामे मंजूर करणे व मंजूर असलेल्या कामांना निधी आणण्याचे काम हाती घेतले असून विकासासाठी कायम प्रयत्नशील असल्याचे यावेळी बनसोडे यांनी सांगितले.

अमरसिंह पंडित यांची शरद पवारांच्या वाढदिवसनिमित्त मोठी घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सामाजिक कार्याचा वसा चालविण्याचे कार्य लाॕयन्स नेत्र रुग्णालयच्या माध्यमातून होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी खा. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रशस्रक्रिया झालेल्या रूग्णाच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay bansode ncp sharad pawar birthday udgir