चिमकुला बनला बहुरूपी कलाकार ; कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करतोय जनजागृती

सुभाष बिडे 
Wednesday, 16 December 2020

जामखेड (जि.अहमदनगर) येथे मोठ्या प्रमाणांवर परिवार हे बहुरूपी म्हणून पारंपारिक व्यवसाय करून लोकांचे मनोरंजन करायचे. त्या बदल्यात मिळेल ती बक्षिसे स्वीकारायची आणि त्यावर आपल्या कुटूंबाची गुजराण करायची.

घनसावंगी (जालना)  : कोरोना विषाणूच्या संसर्गातून उद्भवलेल्या परिस्थितीत कुटूंबाच्या उदरनिर्वाहांचा प्रश्‍न गंभीर बनल्याने जामखेड जि.अहमदनगर येथील चिमुकल्याने व्यवसायात येऊन दरकोस दर गाव मुक्काम करीत मिळालेल्या पैशांतून कुटूंबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे तो कोरोना विषाणू जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे.
  
हे ही वाचा : उमरगा : पाणी वापर संस्थेची प्रक्रिया आणखी कागदावरच ! मृद व जलसंधारण विभागाकडून मिळेनात पाणी परवाने 

जामखेड (जि.अहमदनगर) येथे मोठ्या प्रमाणांवर परिवार हे बहुरूपी म्हणून पारंपारिक व्यवसाय करून लोकांचे मनोरंजन करायचे. त्या बदल्यात मिळेल ती बक्षिसे स्वीकारायची आणि त्यावर आपल्या कुटूंबाची गुजराण करायची. महाराष्ट्राच्या विविध भागात फिरायचे. त्यांच्या खास शैलीत काही खास ठेवणीतील डॉयलॉग मारायचे, समोरच्याची नाडी ओळखून त्याला आवडेल, असे डॉयलॉग मारले की अनेकदा वन्स मोऊरची फरमाईश होते. मग हातात नोट मिळाली की चेहर्‍यावर समाधान आणून पुढे निघायचे.

पावसाळ्यातील काही महिने वगळले तर बाराही महिने यासाठी सतत भटकंती सुरू असते. लॉकडाऊनमुळे उपजिवीकेचीही व्यावसायिक कलाकारी बंद झाली. त्यातच विश्‍वनाथ शिंदे यांचा बहुरूपी म्हणून वडीलोपार्जीत हा व्यवसाय कोरोनाच्या संसर्गातून उद्भवलेल्या परिस्थितीत त्यांना घरी परतावे लागले. घरात होते नव्हते ते सर्व संपत आले. सर्वांना रेशनचे धान्य मिळाले नाही. परंतु सरकारही संकटात आहे. या घडीला सरकारवर टिका न करता सरकारला पाठबळ देणे हे आपले काम आहे. 

हे ही वाचा : जळकोट बाजार समिती बरखास्त, प्रशासकपदी वाघमारे यांची नियुक्ती

या भावनेतून त्यांनी आपला मुलगा इयत्ता सहावीत असलेला संजय विश्‍वनाथ शिंदे हा शांतीवन विद्यालय आरवी ता.शिरूरकासार जि.बीड येथे शिकत होतो. शाळेला सुट्टी असल्याने त्याला घरी परतावे लागले. यासाठी वडीलांनी त्यांना या व्यवसायांचे शिक्षण दिले. आता कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती बदल्याने तो मागील महिन्यापासून राज्यातील अनेक भागात फिरून आपल्या वडीलांकडून शिकलेल्या ज्ञानांवर मोडक्या तोडक्या शब्दात करमणूक करून मिळेल ते बक्षिसे मिळावायचा. असा हा नित्यक्रम सध्या तो घनसावंगी तालुक्याच्या भागात वास्तव्यास असून ख्रिसमसपर्यत थांबून नंतर गावी परतणार आहे. जमा झालेली पुंजी वडिलांकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी कोरोनाच्या काळात कोणतेही सेवाभावी संस्था तसेच शासन मदतीला आले नाही. घरची परिस्थिती हालाखीची म्हणून या व्यवसायात आलो.  शाळा सुरू झाली तर परत घरी परतणार आहोत, असे सांगून शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचे त्यांने सांगितले.     

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घ्या मदत 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी आम्हा बहुरूपी कलाकाराची मदत घ्यावी. आम्ही अत्यंत नाटकी अंदाजात कोरोनाची जागृती करून लोकांचा काळजाचा उठाव घेऊ शकता. घराबाहेर पडू नका, तोंडाला मास्क बांधा, वारंवार हात धुवा, एकमेकांपासून अंतर ठेवा, अशी कोरोना पासून बचावांची चालीसा आम्ही वेगळ्या भाषेत बखान करून चांगल्या प्रकारे जनजागृती करू शकतो.
- संजय विश्‍वनाथ शिंदे, बहुरूपी कलाकार 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Shinde a boy from Ghansawangi is raising awareness to prevent corona infection