संत नामदेव महाराज पालखीला परवानगी नाकारली- भाविकांमधून नाराजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे धर्म संस्थापक असून त्यांनी वारकरी धर्म संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर केला आहे. अशा या थोर संताच्या पालखी परवानगीला राज्य शासनाकडून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी परवानगी न देऊन एक प्रकारे दुर्लक्षित केल्याने नर्सी नामदेव संस्थान व नामदेवाच्या लाखो भक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव या ठिकाणी झाला असून संत नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेले व विठ्ठलाचे सर्वात लाडके भक्त म्हणून सर्व परिचित आहेत.

संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे धर्म संस्थापक असून त्यांनी वारकरी धर्म संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर केला आहे. अशा या थोर संताच्या पालखी परवानगीला राज्य शासनाकडून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी परवानगी न देऊन एक प्रकारे दुर्लक्षित केल्याने नर्सी नामदेव संस्थान व नामदेवाच्या लाखो भक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५१ कोटींचे अनुदान मिळणार

पालखीला परवानगी देण्यात आली नाही.

राज्यामध्ये सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे यावर्षी पायदळ दिंडी सोहळयाला प्रशासनाकडून बंदी असल्याने राज्यभरातील काही प्रमुख पालख्यानांच परवानगी देऊन त्या समारंभपूर्वक पंढरपूर येथे नेण्यासाठी राज्य शासनाकडून शिवशाही बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली मात्र यामध्ये श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पालखीला परवानगी देण्यात आली नाही.
 
एका खाजगी जीपमधून पंढरपूरकडे 

परवानगीची मागणी येथील संस्थान व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी राज्य शासनाकडे वारंवार करूनही शासनाकडून परवानगी डावलण्यात आल्याने अखेर ता. 30 रोजी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेत केवळ तीन वारकरी नामदेवाच्या पादुका घेऊन एका खाजगी जीपमधून पंढरपूर कडे रवाना झाले संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ ते समाधी स्थळ असलेल्या या मानाच्या पालखीला राज्य शासनाकडून परवानगी न देऊन दुर्लक्षित केल्याने संत नामदेव महाराज यांच्या चाहत्या वर्गामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

येथे क्लिक करासचखंड गुरुद्वारा : चीनच्या सिमेवरील शहीद जवानांच्या कुटुंबियाना ११ लाखाची मदत

संत नामदेव महाराजांच्या पालखीची मागील अनेक वर्ष 

वर्षापासूनची परंपरा आहे संत नामदेवांचे जन्मस्थळापासून निघालेल्या या पालखी दिंडी सोहळ्यामध्ये हजारो वारकऱ्यांचा सहभाग असतो या पालखी सोहळ्याचे तीन ठिकाणी भव्य रिंगण सोहळा होतोय तर पंढरपूरमध्ये संत नामदेव महाराज पालखीकडून पुष्प प्रदक्षिणा करण्यात येऊन प्रमुख संताच्या पालखीचे स्वागत करण्याचा मान मागील अनेक वर्षापासून नर्सी येथील संत नामदेवाच्या पालखीला आहे. मात्र हा मान पंढरपूर येथील नामदेवाचे वंशज असून आम्हीच दिंडी चालवत असल्याचे सांगून दिशाभूल करीत आहेत. इतर पालखी प्रमाणे संत नामदेव महाराज यांच्या पालखीला परवानगी मिळणे आवश्यक होते. या पालखी कडून पंढरपूर येथे पुष्प प्रद्रक्षिणा करण्यात येते हे विशेष आहे.
रामेश्र्वर शिंदे (जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sant Namdev Maharaj denied permission to the palanquin- Dissatisfaction from devotees hingoli news