Naxal Attack: लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण असणारा संतोष गडचिरोली स्फोटात हुतात्मा

Naxal Attack: लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण असणारा संतोष गडचिरोली स्फोटात हुतात्मा

हिंगोली : गडचिरोली येथे झालेल्या भूसुरुंग स्फोट मध्ये औढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील जवान संतोष देविदास चव्हाण (वय 38) हुतात्मा झाले आहेत. हे वृत्त कळताच ब्राह्मणवाडा गावावर शोककळा पसरली आहे.

औंढा तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील रहिवाशी रहिवासी असलेले चव्हाण सुमारे आठ वर्षांपूर्वी ता. 13 फेब्रुवारी 2011 मध्ये गडचिरोली पोलिस दलामध्ये भरती झाले होते. त्यांचे वडील देविदास चव्हाण हे देखील हिंगोली येथील राज्य राखीव दलामध्ये होते. त्यामुळे शहिद संतोष चव्हाण यांनाही लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी पोलिस दलामध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते आठ वर्षांपूर्वी गडचिरोली पोलीस दलामध्ये रुजू झाले होते.

दरम्यान  बुधवार ( ता.01 ) नक्षल विरोधी अभियानात गस्त घालत असताना गडचिरोली जिल्ह्यातील लेंडारी गावाजवळ भूसुरुंग स्फोटात ते शाहिद झाले. चव्हाण शहीद झाल्याचे वृत्त ब्राह्मणवाडा गावाला कळताच अडीच हजार लोकसंख्येच्या या गावावर शोककळा पसरली आहे.

अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असलेले जवान संतोष चव्हाण यांचा पाच ते सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता त्यांना दोन मुले आहेत. शहीद जवान चव्हाण यांचा मृतदेह गुरुवारी (ता. 02) ब्राह्मणवाडा येथे आणला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. चव्हाण हे कुटूंबामधे एकुलते एक होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com