

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी अखेर कोर्टानं वाल्मिक कराडसह आरोपींना दणका दिला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोप निश्चिती करण्यात आलीय. आज बीडमधील विशेष मकोका न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.