

what happened in walmik karad court hearing
Esakal
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोप निश्चिती केली. आरोपींनी त्यांच्यावर केलेले आरोप मान्य नसल्याचं कोर्टात सांगितलं. यावेळी वाल्मिक कराडने मला बोलायचं असल्याचं न्यायालयात म्हटलं. तेव्हा न्यायालयाने वाल्मिक कराडला फटकारत तुम्ही फक्त हो की नाही ते सांगा असं विचारलं.