

Walmik Karad: संतोष देशमुख खून प्रकरणात गुरुवारी तिसरी सुनावणी होत आहे. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे कोर्टामध्ये सरकारी पक्षाची बाजू मांडणार आहेत. या सुनावणीपूर्वी धनंजय देशमुख यांचा जबाब बाहेर आलेला आहे. या जबाबामध्ये धनंजय यांनी संतोष देशमुखांचं अपहरण झालं तेव्हा विष्णू चाटेसह वाल्मिक कारडलाही फोन केला होता, असं म्हटलंय.