Grampanchyat Sarpanch Reservation : अंबड तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची पार पडली आरक्षण सोडत

अंबड तालुक्यातील 111 ग्रामपंचायती पैकी 32 ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंचपद सुटले.
grampanchyat sarpanch reservation draw
grampanchyat sarpanch reservation drawsakal
Updated on

अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तहसील कार्यालयात तहसिलदार विजय चव्हाण यांचे व नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, भागवत देशमुखसह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी (ता. 21) सकाळी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून सरपंच पदाचे गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण घोषीत करण्यात आले. यामध्ये काढण्यात आलेले आरक्षण याप्रमाणे आहेत.

सर्वसाधारण: तालुक्यातील 111 ग्रामपंचायती पैकी 32 ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंचपद सुटले आहे. यामध्ये अंतरवाली सराटी, अंतरवाली, सोनक पिंपळगाव, हारतखेडा, चंदनापुरी बु./रेणापुरी, गोरी/गंधारी, रामगव्हाण बु., खडकेश्र्वर/भाटखेडा,दुधपुरी, पाथरवाला बु. कुरण, लासुरा/वडीलासुरा, दहयाळा, माहेर भायगाव,घृंगरडे हादगाव, नांदी, वाळकेश्र्वर, कौचलवाडी,भालगाव, कुक्कडगाव, नालेवाडी, सिरनेर, दाढेगाव/मठतांडा,बनटाकळी, शहापुर, चंदनापुरी खुर्द, चुर्मापुरी, देशगव्हाण, चिकनगाव माळयाचीवाडी/भोकरवाडी, बक्षाचीवाडी/लेंभेवाडी, पांगरखेडा, मठजळगाव, शहागड या गावाचा समावेश आहे.

सर्वसाधारण महिलासाठी 32 गावात सरपंचपद राखीव:तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीपैकी 32 गावात सरपंच पद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. यामध्ये किनगाव, दुनगाव, ताडहादगाव,काटखेडा, डोमेगाव, गोंदी, वडीकाळ्या, बदापुर/अंतरवाला/आवा, महाकाळा/भगवाननगर/गहिनीनाथनगर, भार्डी, पिठोरी सिरसगाव, कोठाळा खुर्द, बळेगाव, ईश्वरनगर/वसंतनगर/कैलासनगर, रामनगर, कोळीसिरसगाव, रोहिलागड, दहेगव्हाण/बेलगाव/ बनगाव , साष्टपिंपळगाव, डावरगाव, मसई, जोगेश्वरवाडी/विठ्ठलवाडी/पागीरवाडी, नागोण्याचीवाडी, गोविंदपुर, राहुवाडी/गंगारामवाडी, पावसेपांगरी, सुखापुरी, हस्तपोखरी, एकलहेरा, बारसवाडा या गावाचा समावेश आहे.

नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 15 गावचे सरपंचपद राखीव - तालुक्यातील पंधरा गावातील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबिसी) साठी राखीव ठेवण्यात आले आहे. यामध्ये चिंचखेड, बठाण खुर्द ,आलमगाव, दोदडगाव/सौंदलगाव, झिरपी, कर्जत, पानेगाव, पाथरवाला खुर्द, गंगाचिंचोली/इंदलगाव, पराडा, मठपिंपळगाव, शिराढोण/वाडीशिराढोण, टाका, धनगरपिंपळगाव, चांभारवाडीचा समावेश आहे.

नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी 15 गावचे सरपंचपद राखीव - तालुक्यातील पंधरा गावातील सरपंचपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. यामध्ये आपेगाव, झोडेगाव/कानडगाव, करंजळा/लासुरा/रेवलगाव, साडेसावंगी,खेडगाव, लालवाडी, भनगजळगाव, रुई, नागझरी, शेवगा, पिंपरखेड, हसनापुर, बोरी, लखमापुरी, निहालसिंगवाडी या गावाचा समावेश आहे.

अनुसूचित जातीसाठी सात गावात सरपंचपद आरक्षित - तालुक्यातील सात गावात अनुसूचित जातीसाठी सरपंच राखीव झाले आहे. यामध्ये सारंगपुर, भिवंडीबोडखा, नारायणगाव,(कासारवाडी),दहीपुरी, ढाकलगाव, ढालसखेडा, लोणारभायगावचा समावेश आहे.

अनुसूचित महिला जातीसाठी सात ग्रामपंचायतचे सरपंचपद राखीव - तालुक्यातील सात गावात अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी वलखेडा, किनगाववाडी, पारनेर, साडेगाव, भांबेरी, धनगरपिंपरी, जमखेडचा समावेश आहे.

अनुसूचित जमातीसाठी डोमलगाव तर महिला अनुसूचित जमातीसाठी मार्डी , वडीगोद्री या गावाचा समावेश आहे.

अंबड तालुक्यातील 111 पैकी 56 ग्रामपंचायतीवर महिला राज करणार आहे. गावच्या विकास कामासाठी महिला सरपंचाची भुमिका महत्वाची असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com