मदत कार्यात बचत गटही सरसावले !

कृष्णा पिंगळे
Saturday, 11 April 2020

सर्वोदय लोकसंचलीत साधन केंद्र सोनपेठ यांनी शहरातील बचत गटांना इंटरनेटच्या माध्यमातून मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाने यामध्ये पुढाकार घेऊन दररोज पन्नास मास्क तयार करत आहेत. सामाजिक भावना जोपासून गरजूंना हे मास्क अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

सोनपेठ (जि.परभणी) :  जगभर कोरोनाच्या विरुद्ध युद्ध सुरू असून या लढाईत सर्वच जण आपापल्या पध्दतीने मदत करत असताना आता सोनपेठ तालुक्यातील महिला बचत गटदेखील आपली भूमिका चोख बजावत आहेत. 
कोरोना व्हायरसच्या विरोधात प्रत्येकजण जमेल त्या मार्गाने मदत करत आहेत. तालुक्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या लोक संचलित साधन केंद्राच्या माध्यमातून गरजू महिलांना जीवनाशयक वस्तूंच्या साहित्यासह या लढाईत महत्वाचे शस्त्र असणाऱ्या मास्क निर्मितीतही महिला बचत गट पुढे सरसावले आहेत. कोरोनाला हारविण्यासाठी मास्क ही वस्तू अत्यंत आवश्यक असून दर्जेदार व स्वस्त असे मास्क तयार करण्यासाठी सर्वोदय लोकसंचलीत साधन केंद्र सोनपेठ यांनी शहरातील बचत गटांना इंटरनेटच्या माध्यमातून मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.

हेही वाचा व पहा -Video : ‘कोरोनाने’ कोमेजली फुले !

 दररोज पन्नास मास्क 
सोनपेठ शहरातील श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाने यामध्ये पुढाकार घेऊन दररोज पन्नास मास्क तयार करत आहेत. सामाजिक भावना जोपासून गरजूंना हे मास्क अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

बारा महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सर्वोदय लोकसंचलीत साधन केंद्रामार्फत राज्याभिषेक वस्तीस्तर संघातील आठ बचत गटातील महिलांनी आपल्या नफ्यातून केसांवर फुगे पिना विकून उदरनिर्वाह करणाऱ्या बारा महिलांना जीवनावश्यक वस्तू किराणा साहित्याचे वाटप केले. सर्वोदय केंद्राच्या वतीने तालुक्यातील गरजू महिलांना योग्य ती मदत करत असल्याचे साधन केंद्राच्या व्यवस्थापिका सय्यद नसीमा यांनी सांगितले. यामध्ये कुठेही फोटो न काढता व कुठलीही प्रसिद्धी न करता ही मदत करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

हेही वाचा व पहा - Video:जप्त केलेले वजन काटे पळविले

हेही वाचा...
खासदार जाधव यांच्या धान्य वाटप

परभणी : कोरोना विषाणुचा संसर्ग नष्ट करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बिकट असूनही  देशहितासाठी कायद्याचे पालन करत घरी राहणाऱ्या गोरगरीब व गरजू जनतेस मदतीचा हाथ म्हणून खासदार संजय जाधव यांच्या वतीने परभणी लोकसभा मतदार संघात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.
या मध्ये प्रामुख्याने गहू, तांदूळ, दाळ, तेल पॉकेट, साखर, मिरची पावडर, हळद पावडर, अंघोळीची साबण,कपड्यांची साबण इत्यादी वस्तूंच्या समावेश आहे. गरजू व्यक्तींना शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्फत हे वाटप केले जात आहे. या प्रसंगी खासदार संजय जाधव यांच्या वतीने गरजूनां जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख माणिक पोंढे व शिवसैनिक उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saving groups helped in the work !,parbhani news