Video:जप्त केलेले वजन काटे पळविले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी शहरातील सर्व हातगाडीवाले, रस्त्यावरील व्यावसायिकांना सुरक्षीत अंतरचा नियम पाळण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. परंतू, या आदेशाचे पालन होत नाही. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने हातगाडीवाल्यांचे वजन काटे जप्त केले. या वेळी हातगाडीवाल्यांची महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.

परभणी : गांधी पार्क येथील रस्त्यावर गर्दी कमी करण्यासाठी शनिवारी (ता.११) गेलेल्या महापालिकेच्या पथकाला तेथील हातगाडीवाले व विक्रेत्यांनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली. तसेच जप्त केलेले वजन काटे वाहनाला गराडा घालून अनेकांनी पळवून नेले अनेकांनी पळवून नेले.

महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी शहरातील सर्व हातगाडीवाले, रस्त्यावरील व्यावसायिकांना सुरक्षीत अंतरचा नियम पाळण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. हातगाडे  रस्त्यावर न थांबवता फिरुन  भाजीपाला अथवा फळे विक्री करण्याचे आदेशदेखील बजावले आहेत. तरीदेखील मोठ्याप्रमाणात हातगाडीवाले शहराच्या मध्यवस्तीतील चौकाचौकात एका रांगेत जवळजवळ आपले व्यवसाय करीत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. शनिवारी काळीकमान, गांधी पार्क, यात्रा भरल्याचे चित्र दिसून आल्यानंतर महापालिकेच्या पथकाने आर. आर टाँवर,  गांधी पार्क, क्रांती चौक, गुजरी बाजार आदी परिसरात फेरफटका मारला असता  तेव्हा त्यांना अनेक व्यावसायिक जवळजवळ बसून, थांबून व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले. तसेच सांगितल्यानंतरही ते जुमानत नसल्याचेही सूत्रांनी माहिती दिली.

कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की
 तेव्हा या पथकाने त्यांचे वजन काटे जप्त करण्याची कारवाई करून वजन काटे वाहनात टाकले. तेव्हा तेथील अनेक हातगाडेवाल्यांनी या वाहनाला गराडा घालून तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करीत वाहनातून जप्त केलेले काटे पळवण्याची माहिती सूत्रांनी दिली.  याप्रकरणी पालिका प्रशासनाने अद्यापही तक्रार केलेली नसून तक्रार करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचा - उत्पादन शुल्कने पकडली सहा लाखाची दारु

हातगाडेवाल्यांना हितचिंतकांचे पाठबळ
परभणी शहरात हातगाडीवाले, रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांच्या मुजोरीचे चित्र नेहमीच दिसून आलेले. परंतु, सध्याच्या आपत्कालीन परिस्थित त्यांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असताना ते मात्र होतांना दिसून येत नाही. त्यांना पालिकेतील अनेक नगरसेवकांचे, माजी नगरसेवकांचे भक्कम पाठबळ असून त्यांच्यासाठी प्रशासनाला धारेवर धरण्याचे कामदेखील अनेक वेळा झालेला आहे. परंतु, सध्याची त्यांची ही मुजोरी परवडणारी परवडणारी नाही. त्यांच्या पाठीराख्या लोकसेवकांनी याबाबत पुढाकार घेऊन शहराला वेठीस धरू नये, असे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The seized weight bites escaped,parbani news