दुर्धर आजाराशी झुंज देत सायली ठरली गुणवान

विकास गाढवे
शुक्रवार, 8 जून 2018

लातूर - दर दहा ते बारा दिवसांनी दवाखान्यात जाऊन रक्त घ्यायचे. दिवसभर औषधांचा मारा तो वेगळाच. रक्त घेतल्यानंतर तीन ते चार दिवस त्रास व्हायचा. शाळा तर सोडाच परंतू ट्यूशनलाही तिला जायले जमले नाही. जन्मानंतर सातव्या महिन्यापासूनच थॅलेसमिया (मेजर) या दुर्धर आजाराशी तिची झुंज सुरू आहे. या आजाराशी संघर्ष करत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ती दहावी परीक्षेत गुणवान ठरली आहे. शुक्रवारी (ता. आठ) दहावीच्या निकालानंतर तिला मिळालेले 65 टक्के गुण सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे ठरले.   

सायली सतीश सातपूते असे या गुणवान विद्यार्थिनीचे नाव आहे. परिमल विद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. मुळची निलंगा येथील असलेल्या सायलीला जन्मानंतर सातव्या महिन्यातच थॅलेसिमिया आजार असल्याचे उघड झाले. तेथून तिची गुजराण औषधे व दरमहा घ्याव्या लागणाऱ्या रक्तावर सुरू आहे. या स्थितीत तिने सातवीपर्यंतचे शिक्षण निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयात पूर्ण केले. सायली पूर्वीपासूनच हुशार आहे. मात्र, दुर्धर आजाराने ग्रासल्याने तिला अभ्याससोबत परीक्षा देतानाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. आजारावरील उपचार सोयीचे व्हावे, यासाठी तिचे कुटुंब लातूरला आल्यानंतर तिने आठवीला परिमल विद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, आजारामुळे तिला नियमित शाळेत जाता आले नाही. पूर्वी दरमहा घ्यावे लागणाऱ्या रक्ताचा कालावधी कमी झाला. आता दर दहा ते बारा दिवसाला तिला रक्त घ्यावे लागत आहे. यामुळे तिला घरी बसूनच अभ्यास करावा लागला. माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेत यु ट्यूबवरील व्हिडीओ पाहून तिने अभ्यास केला. दहावी परीक्षेच्या काळात तिला तीन वेळा दवाखान्यात अॅडमिट करावे लागले. परीक्षेत तिला प्रश्नाची उत्तरे येत असतानाही आजारामुळे हात दुखत असल्याने ती सोडवू शकली नाही. या स्थितीत तिला दहावी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची खात्री होती. दहावी परीक्षेत 65 टक्के गुण घेतल्यानंतर तिच्या कुटुंबियांसह सर्वांनाच आनंद झाला. दुर्धर आजाराच्या वेदना सोसतानाही तिला मिळवलेले यश धडधाकट व्यक्तीतील पंगू मानसिकेला छेद देणारे ठरले आहे. 

पात्र असतानाही लेखनिक नाकारला
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दहावी बोर्डाने लेखनिक देण्याची सोय केली आहे. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानंतर त्याला बोर्डाकडून उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी लेखनिक देण्यात येतो. सायली यासाठी पात्र असतानाही तिने लेखनिक नाकारून स्वतः परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे तिच्या कुटुंबियांसह शिक्षकांनाही कौतुक आहे. तिचे वडील सतीश सातपूते हे मुरूडच्या (ता. लातूर) जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत विशेष सहायक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी, तिची आई शितल व मामा धनराज गायकवाड यांनी सायलीला परीक्षेसाठी सातत्याने बळ दिले.   

Web Title: sayli satpute got good parcentage in 1oth exam