Umarga News : चोरट्यांनी एटीएम मशिन फोडून आठ लाख २६ हजाराची रक्कम पळविली

एसबीआय बॅंकेच्या बलसुर शाखेतील घटना ; तीन महिन्यात याच "एटीएम"वर चोरट्यांचा दुसऱ्यांदा डल्ला
sbi atm broke stolen 8 lakh at umarga balsur police action
sbi atm broke stolen 8 lakh at umarga balsur police action Sakal

उमरगा : तालुक्यातील बलसूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखेचे एटीएम मशिन फोडून अनोळखी चोरट्यांनी जवळपास आठ लाख २६ हजार रोकड पळविली. मंगळवारी (ता.३०) मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला.

याबाबतची माहिती अशी की, बलसुर येथे एसबीआय बँकेचे एटीएम कार्यरत आहे, एनन्सीमार्फत एटीएममध्ये रक्कम भरली जाते.   मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम मशिनचे कॅश वॉल्ट गॅस कटरने कापुन त्यातील रक्कम काढताना दोन ट्रेनमधील जवळपास आठ लाख २६ हजार शंभर रुपये रक्कम हाती लागली.

चोरट्यांनी हा प्रकार सुरू केल्यानंतर एटीएम मशिनमध्ये अचानक लाग लागल्याने वेगवेगळ्या नोटा असलेल्या तीन हजार सहाशे रुपये आगीत जळाले आहेत. कांही शिल्लक रक्कमेची अधिक माहिती मिळू शकली नाही.

या घटनेसंदर्भात रात्री एक वाजुन ५२ मिनीटाला ११२ डॉयल क्रमांकावरुन पोलिसांनी माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. आर. गायकवाड, बीट अमलदार वाल्मिक कोळी, विष्णू मुंडे आदी कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेंव्हा एटीएम मशिन जळत होती.

पोलिस व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अमोल अरूण पवार रा. बाळे सोलापूर यांच्या तक्रारीनुसार अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ गायकवाड तपास करीत आहेत. दरम्यान अप्पर पोलीस अधिक्षक गोहर हसन,उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

एकाच ठिकाणी चोरट्यांचा दुसऱ्यांदा चोरीची पद्धत सारखीच !

साधारणतः तीन महिन्यापूर्वी याच ठिकाणची एटीएम मशिन फोडून चोरट्यांनी २६ लाख ८८ हजाराची रोकड पळविली होती. या घटनेचा तपास आणखी उजेडात येण्याअगोदर चोरट्यांनी मंगळवारी रात्री दुसऱ्यांदा एटीएम मशिन फोडली.

अगदी क्षणा, क्षणाचे नियोजन करून चोरट्यांनी चोरीचे धाडस केले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद न होण्याची सावधगिरी बाळगत सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचे स्प्रे मारण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सीसीटिव्ही फुटेजचीही पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com