School Bus Accident : चालकाच्या निष्काळजीपणामुळे स्कुल बसचा अपघात; २२ विद्यार्थी जखमी

शाळेसाठी विद्यार्थी घेऊन येत असलेली स्कुल बस पलटी होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयातील २२ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली.
School Bus Accident

School Bus Accident

sakal

Updated on

चाकूर - सांडोळ (ता. चाकूर) येथून राचन्नावाडी येथील शाळेसाठी विद्यार्थी घेऊन येत असलेली स्कुल बस पलटी होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयातील २२ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ८) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. स्कुल बसमध्ये जवळपास ३५ ते चाळीस विद्यार्थी होते, चालक मोबाईलवर बोलत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बस पलटी झाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. जखमींपैकी दोन विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com