शालेय पोषण आहार योजना पोरकी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

पैठण पंचायत समिती - पाच वर्षांपासून नाही अधीक्षक, अन्य पदांवरही प्रभारी

पाचोड - पैठण पंचायत समितीअंतर्गत शालेय पोषण आहार योजनेच्या अधीक्षकपदाचे (वर्ग दोन) कामकाज प्रतिनियुक्तीवरील शिक्षक सांभाळत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हे पद रिक्त आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनाच प्रमुखाविना कुपोषित झाल्याचे चित्र आहे.

पैठण पंचायत समिती - पाच वर्षांपासून नाही अधीक्षक, अन्य पदांवरही प्रभारी

पाचोड - पैठण पंचायत समितीअंतर्गत शालेय पोषण आहार योजनेच्या अधीक्षकपदाचे (वर्ग दोन) कामकाज प्रतिनियुक्तीवरील शिक्षक सांभाळत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हे पद रिक्त आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनाच प्रमुखाविना कुपोषित झाल्याचे चित्र आहे.

पैठण तालुक्‍यातील शिक्षण विभागात तीन वर्षांपासून ‘प्रभारी’राज सुरू आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची चार, केंद्रप्रमुखाची आठ, मुख्याधापकाची बारा, पदवीधर प्राथमिक शिक्षकाची चौदा, उर्दू प्राथमिक सहशिक्षकाची सहा पदे तीन वर्षांपासून रिक्त आहेत. सहा-सात वर्षांपासून अनेक शिक्षक प्रतिनियुक्तीवर अन्य विभागांत मोठ्या रुबाबाने जबाबदारी सांभाळत आहेत. त्यापाठोपाठ पंचायत समितीअंतर्गत शालेय पोषण आहार योजना वर्ग- दोनचे अधीक्षकपद पाच वर्षांपासून रिक्त आहे. या रिक्त पदाचा प्रशासनालाच विसर पडला आहे.

आखतवाडा प्राथमिक शाळेवरील पदवीधर प्राथमिक शिक्षक पांडुरंग नाचण हे पाच वर्षांपासून अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळत होते; परंतु ग्रामस्थांच्या रेट्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना कार्यमुक्त करून याची तात्पुरती जबाबदारी अन्य प्रभारी व्यक्तीकडे सोपविण्यात आली. 

शाळाबाह्य विद्यार्थ्यांत शिक्षणाची गोडी निर्माण होऊन त्यांचे कुपोषण थांबविण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित केली. तालुक्‍यातील सर्व शाळांना आहार पुरवून त्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी वर्ग- दोनचे पद कार्यान्वित करण्यात आले; परंतु तालुक्‍यात हे पद पाच वर्षांपासून रिक्त असल्याने शालेय पोषण आहार योजनेत गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप केला जातो. 

शालेय पोषण आहार योजनेची रिक्त पदे भरण्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे. नवीन व्यक्ती येताच त्यांना रुजू करून घेण्यात येईल.

- व्यंकट कोमटवार, गटशिक्षणाधिकारी, पैठण

रिक्त जागा तातडीने भराव्यात. ही पदे भरण्यासाठी आम्ही मासिक बैठकीत वारंवार मुद्दा उपस्थित केला. मात्र, गांभीर्याने घेतले गेले नाही. शिक्षण विभागातील प्रभारीराज थांबविण्यात यावे.

- पुष्पाताई केदारे, सभापती, पंचायत समिती

Web Title: School feeding program fatherless