हातावर शिक्का दिसला अन, नागरिकांची धावपळ सुटली

पांडुरंग उगले 
Tuesday, 24 March 2020

राम पिंपळगाव (ता. माजलगाव, जि. बीड) येथील एक इसम मंगळवारी थेट पुण्याहून माजलगावात आला. दुपारी संचारबंदी शिथिल केल्याच्या काळात तो थेट एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. तेथील नागरिकांनी त्याच्या हातावरील होम कोरंटाईमचा शिक्का बघितला एन एकच गोंधळ उडाला.

माजलगाव, (जि. बीड) - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेली संचारबंदी मंगळवारी (ता.२४) ११ वाजता शिथिल केली. यामुळे अनेक नागरीक बँकेच्या ए.टी.एम. मध्ये आले होते. एका नागरिकाच्या हातावर होम कोरंटाईमचा शिक्का दिसला अन एकच गोंधळा उडाला. सर्वांच्या नजरा त्या व्यक्तीवर खिळल्या. एवढ्यात पोलीस, तहसीलदार आले अन त्यांनी शिक्का असलेल्या इसमाची घराकडे रवानगी केली.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मंगळवार (ता.२४) मध्यरात्रीपासून ३१ मार्च पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्र लॉक डाऊन करून जिल्ह्याच्या सीमा बंद केल्यात. सर्व एसटी वाहतूक बंद करून खाजगी वाहनांची तपासणी करण्यात येतेय. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही, फारच अडचण असेल तर त्या नागरिकांच्या हातावर होम कोरंटाईमचा शिक्का मारून त्याला १५ दिवस घरातच थांबण्याची सूचना देऊन सोडण्यात येते. राम पिंपळगाव (ता. माजलगाव, जि. बीड) येथील एक इसम मंगळवारी थेट पुण्याहून माजलगावात आला. दुपारी संचारबंदी शिथिल केल्याच्या काळात तो थेट एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. तेथील नागरिकांनी त्याच्या हातावरील होम कोरंटाईमचा शिक्का बघितला एन एकच गोंधळ उडाला.

हेही वाचा - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

प्रत्येकाच्या नजरा संशयाने त्याच्या चेहऱ्यावर खिळल्या अन सर्वजण त्याच्यापासून दुर झाले. त्यातील एकाने बँकेच्या अधिकाऱ्याला माहिती देऊन अधिकाऱ्याने थेट तहसीलदार, पोलिसांना फोन केला. काही मिनिटातच तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, पोलीस अधिकारी बँकेत आले. त्याची विचारपूस करून त्याला लगेच घरी जाण्याचे सांगितले. येवढेच नव्हे तर तहसीलदार डॉ. गोरे या त्याच्या पाठीमागे राम पिंपळगाव पर्यंत गेल्या. पुढील पंधरा दिवस घराच्या बाहेर न पडण्याचा सल्ला देऊन गावातील सरपंच, ग्रामसेवकांना त्याच्यावर नजर ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

मुंबई, पुण्यासारख्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांसह कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांच्या हातावर होम कोरंटाईमचा शिक्का मारण्यात येत आहे. संबंधित इसम बाहेच्या जिल्ह्यातून आल्याने त्याच्या हातावर शिक्का मारला होता. त्याला घरी सोडून बाहेर न निघण्याच्या सूचना केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A seal was seen on his hand, and the civilians were running away