परभणी जिल्ह्यात एसटीला दुसऱ्या दिवशीही ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

परभणी : परभणी जिल्ह्यात एसटी कामगारांच्या संपामुळे सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसेस धावल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाश्याचे मोठे हाल झाले. संपाची माहिती नसलेल्या ग्रामीण भागातील प्रवाश्यांचे यामुळे मोठे हाल झाले.

एसटी कामगारांनी वेतनासह इतर मागण्यासाठी शुक्रवारी (ता.8) पासून संप पुकारला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात काही अंशी बसगाड्या धावल्या. परंतू रात्री पासून एकही बस गाडी आगारा बाहेर पडली नाही. शनिवारी (ता.9) सकाळपासून एकही बसगाडी जिल्ह्यातील कोणत्याही आगारा पडली नाही. एसटीच्या संपामुळे प्रवाश्याचे  मोठे हाल झाले. खासगी वाहन चालकांचे चांगलेच फावले आहे. खासगी जिप चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी सुरु झाली आहे. ग्रामीण भागातील ज्या प्रवाश्यांना संपाची माहिती नव्हती असे अनेक जण परभणी बसस्थानकात आले होते. परंतू बस कर्मचाऱ्यांचा संप असल्याचे समजल्यानंतर त्यांचे मोठे हाल झाले.

Web Title: on second day hunger strike continues in parbhani