अनाडला दुसऱ्या दिवशीही बिबट्याचा हल्ला; गोऱ्हा ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

अनाड (ता. सिल्लोड ) येथे बिबट्याचे हल्लासत्र सुरुच असून, दुसऱ्या दिवशी बुधवारी ( ता. 21 ) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक वर्षाच्या गोऱ्ह्याला ठार केले. यात शेतकऱ्याचे दहा हजार रूपयांचे नुकसान झाले. सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .

अजिंठा (जि.औरंगाबाद) ः अनाड (ता. सिल्लोड ) येथे बिबट्याचे हल्लासत्र सुरुच असून, दुसऱ्या दिवशी बुधवारी ( ता. 21 ) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक वर्षाच्या गोऱ्ह्याला ठार केले. यात शेतकऱ्याचे दहा हजार रूपयांचे नुकसान झाले. सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .

नेहमीप्रमाणे सांयकाळी शेतकरी चरणसिंग मोहनसिंग पवार यांनी शेतातील गोठ्यात बैल, गाई, म्हशी, गोऱ्हयाला चारा- पाणी करून बांधले होते. बिबट्याने गोठ्यात येऊन गोऱ्ह्यावर हल्ला करुन त्याला ठार केले. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनरक्षक आर.डी. पठाण, वनपाल गवंडर, वनमजूर वाल्मिक साबळे आदींनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

सध्या शेतात मका पीक वाढलेले असून, वन्य प्राण्यांना लपण्यास त्यात भरपूर जागा आहे. यामुळे परिसरात दिवसाढवळ्याही बिबट्याचे दर्शन होत आहे. त्याची ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second day leopard attacked