Hingoli News : सिकंदराबाद-हिंगोली-उदयपूर स्पेशल रेल्वे धावणार

प्रवाशांची वाढती मागणीमुळे रेल्वे प्रशासनाने सिकंदराबाद-हिंगोली-उदयपूर दरम्यान स्पेशल रेल्वेच्या दोन फेरी चालविण्यात येणार आहेत.
secunderabad hingoli udaipur special express will run railway administration
secunderabad hingoli udaipur special express will run railway administrationSakal

हिंगोली : पूर्णा ते अकोला रेल्वे मार्गाने सिकंदराबाद-हिंगोली-उदयपूर दरम्यान स्पेशल रेल्वे १७ व २४ एप्रिल धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.प्रवाशांची वाढती मागणीमुळे रेल्वे प्रशासनाने सिकंदराबाद-हिंगोली-उदयपूर दरम्यान स्पेशल रेल्वेच्या दोन फेरी चालविण्यात येणार आहेत.

रेल्वे क्रमांक ०७१२३ सिकंदराबाद येथून मंगळवार १६ व २३ एप्रिल रोजी रात्री ११.५० वाजता सुटून निजामाबाद, बासर, नांदेड, पूर्णा व वसमत येथील थांब्यासह हिंगोली रेल्वे स्थानकावर बुधवार १७ व २४ एप्रिल रोजी सकाळी ९.४० वाजता पुढे वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, कोटा, सवाई माधोपुर, जयपूर,

अजमेर, विजयनगर, भिलवाडा, उदयपूर येथे गुरुवार १८ व २५ एप्रिल रोजी सकाळी ५.२५ वाजता पोचणार आहे.ही रेल्वे कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष धरमचंद बडेरा, जेठानंद नेनवाणी, गणेश साहु, प्रतीक अग्रवाल, भरतलाल साहु यांनी केली आहे.

रेल्वेत दोन जनरल व दहा स्लीपर डबे

परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक ०७१२४ उदयपूर येथून शनिवार २० व २७ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता निघून आलेल्या मार्गाने हिंगोली येथे सोमवार २२ व २९ एप्रिल रोजी रात्री १.३० वाजता पोचतील पुढे वसमत, पूर्णा, नांदेडमार्गे सिंकदराबाद येथे सोमवारी सकाळी ९.४५ वाजता पोचतील. २४ डब्बे असलेल्या या रेल्वेत दोन जनरल व दहा स्लीपर क्लासचे डब्बे जोडले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com