सुरक्षारक्षकाच्या मुलीचे बारावीत घवघवीत यश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

चांगले गुण मिळवण्यासाठी सुविधा नसल्या तरी चालतील; पण कष्टाची तयारी पाहिजे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एका सुरक्षारक्षकाच्या मुलीने बारावीच्या वाणिज्य शाखेतून विवेकानंद महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

औरंगाबाद - चांगले गुण मिळवण्यासाठी सुविधा नसल्या तरी चालतील; पण कष्टाची तयारी पाहिजे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एका सुरक्षारक्षकाच्या मुलीने बारावीच्या वाणिज्य शाखेतून विवेकानंद महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

वैष्णवी संदीप आगळे असे या विद्यार्थिनीचे नाव असून, शहरातील शहागंज, चेलिपुरा येथे ती राहाते. तिला ६५० पैकी ५९४ म्हणजे ९१.३८ टक्के गुण मिळाले आहेत. वैष्णवीने पर्यावरण एज्युकेशन या विषयात ५० पैकी ५०, तर बॅंकिंगमध्ये २०० पैकी १९५ गुण मिळविले आहेत. 

तिचे वडील संदीप हे एका कंपनीत सुरक्षारक्षक असून आई गृहिणी आहे. वैष्णवीच्या लहान बहिणीने यंदा दहावीची परीक्षा दिली आहे. तिलाही ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळतील, अशी खात्री वडील संदीप यांना आहे. 

विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी वैष्णवीला निकालाच्या दिवशीच महाविद्यालयात बोलावून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पुढील शैक्षणिक वाटचालीसंबंधी विचारले असता वैष्णवीने फायनान्स, शेअर मार्केट याविषयी आवड असल्याचे सांगितले, तर सी.ए. होण्याचा मानस व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security child success in HSC