esakal | हिंगोली जिल्ह्यात कृषी योजनेसाठी ९०२ लाभार्थ्यांची निवड

बोलून बातमी शोधा

स्वावलंबन योजना
हिंगोली जिल्ह्यात कृषी योजनेसाठी ९०२ लाभार्थ्यांची निवड
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांति योजनेच्या विविध लाभासाठी जिल्ह्यातील ९०२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

योजनेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी लाभार्थ्यांना स्वालवंबन योजना २०२०- २१ या बाबीचा आर्थिक वर्षात महाडिबीटीद्वारे ऑनलाईन लॉटरी पद्धतीने अनुसुचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांची महाडिबीटीद्वारे योजनेंतर्गतच्या विविध बाबीसाठी निवड करण्यात आली आहे.

ज्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी ३३१ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. जुनी विहीर दुरुस्तीचा लाभ २२७ शेतकऱ्यांना मिळणार आहे. विद्युत जोडणीसाठी ३२ इनवेल बोअरींग ६२ तर विद्युत पंपासाठी ७७ शेतकऱ्यांची निवड या योजनेंतर्गत झाली असून एकूण ७२९ लाभार्थ्यांना या योजनेतील विविध बाबीचा लाभ मिळणार आहे, तर बिरसा मुंडा कृषी क्रांति योजनेंतर्गत ( क्षेत्रा बाहेर ) सन २०२०- २१ मध्ये महाडिबीटीद्वारे ऑनलाईन पद्धतीने योजनेच्या निवड झालेल्या अनुसुचित जमाती शेतकऱ्यांना विविध बाबीचा लाभ दिला जाणार आहे.

हेही वाचा - वसमतमध्ये १०० बेडचे विनामुल्य कोविड सेंटर चालवणार; कन्हैया बाहेतीनी मागितली परवानगी

त्यासाठी नवीन विहिरीसाठी ४१ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. जुनी विहीर दुरुस्तीसाठी ७१ इनवेअल बोअरीग १३, विद्युत पंप आठ, डिझेल इंजीन दोन, सोलारपंप १६, पीव्हीसी पाईप १९, किचन गार्डन तीन अशा १७३ लाभार्थ्यांची निवड सदर योजनेंतर्गत करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून या दोन्ही योजनेची अंमलबजावणीमध्ये केली जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी पद्धतीने योजनेच्या अटीची पूर्तता केल्यानंतर त्यांना अनुदानाचा लाभ दिला जाणार दिला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे