esakal | कोरोना विशेष उपचारासाठी ‘या’ दोन रुग्णालयांची निवड

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

गुरुवारी (ता.दोन एप्रिल २०२०) रोजी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालयांत कोरोना विशेष उपचारासाठी रुग्णालयांची नावे जाहिर केली आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय (जुने) या ठिकाणी ५० व मुखेड उपजिल्हा रुग्णालयात ५० आयसोलेशन वॉर्डची निवड केली आहे. 

कोरोना विशेष उपचारासाठी ‘या’ दोन रुग्णालयांची निवड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : देशभरात वाऱ्याच्या वेगाने कोरोना व्हायरस पसरत आहे. वेगाने पसरणाऱ्या या आजाराला वेळीच प्रतिबंध करण्याच्या दृष्टिने राज्यशासनाने कठोर पावले उचलली आहेत. गुरुवारी (ता.दोन एप्रिल २०२०) रोजी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालयांत कोरोना विशेष उपचारासाठी रुग्णालयांची नावे जाहिर केली आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय (जुने) या ठिकाणी ५० व मुखेड उपजिल्हा रुग्णालयात ५० आयसोलेशन वॉर्डची निवड केली आहे. 

या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून दोन हजार ३०५ खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात झाल्या आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती जारी करण्यात आल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना  केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे.

हेही वाचा- वाढदिवसाचा खर्च टाळून एक लाखाची मदत

जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष
राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषीत करण्यात आली असून त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे.  
हेही वाचले पाहिजे- हिंगोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मराठवड्यातील रुग्णालयांची नावे (कंसात खाटांची संख्या)
नांदेड ः  जिल्हा रुग्णालय जुने (५०) आणि मुखेड उपजिल्हा रुग्णालय (५०)
हिंगोली ः जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (५०) 
औरंगाबाद ः जिल्हा रुग्णालय (१००)   
लातूर ः  उदगीर उपजिल्हा रुग्णालय (५०)
उस्मानाबाद ः जिल्हा रुग्णालय, नविन इमारत (१००), उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (५०) आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नविन इमारत (५०)