
लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत बचतगटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उत्पादने तयार केली जात आहेत. यापैकी तीन बचतगटांच्या उत्पादनांची विक्री आता नागपूर विमानतळावरील दालनात होणार आहे.