esakal | सेलू: लोअर दूधनाचे चार दरवाजे उघडले
sakal

बोलून बातमी शोधा

सेलू: लोअर दूधना धरणाचे चार दरवाजे उघडले

सेलू: लोअर दूधना धरणाचे चार दरवाजे उघडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सेलू : तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी (ता. ११) झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात ९७.१७ टक्के जिवंत जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रविवारी (ता. १२) रोजी प्रकल्पाचे द्वार क्र. १, २,१९ व २० हे चार दरवाजे ०.३० मीटरने उचलून दूधना नदीपात्रात एकूण= १०८५x४=४३४० क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

हेही वाचा: चुकीच्या पत्त्यामुळे 'नीट' परीक्षा देणाऱ्यांची धांदल

धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन लोअर दुधना प्रकल्प, पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

loading image
go to top