सेलूत बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

सदर विद्यार्थीनीच्या वडिलांचा दीड वर्षापूर्वी ह्रदय विकाराने मृत्यु झाला होता. ऐश्वर्याला वडिलांच्या विरहाचा ताण सहन न झाल्यामुळे तसेच बारावी सीईटी परीक्षेचा पेपर अवघड गेला असल्याकारणाने तिने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली

सेलू - शहरातील जिंतूर काँलनी परिसरातील इयत्ता बारावीच्या वर्गातील एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीने अापल्या राहत्या घरी छताला साडीने गळफास घेवून अात्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास उघडकीस अाली. या घटनेची सेलू पोलिस ठाण्यात अाकस्मित मृत्युची नोंद झाली अाहे.

शहरातील जिंतूर काॅलनी परिसरातील रहिवाशी कु.एेश्वर्या सुनिल सोळंके (वय १७ ) हिने घराच्या छताला साडीने गळफास घेवुन अात्महत्या केली. या बाबत पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार, सदर विद्यार्थीनीच्या वडिलांचा दीड वर्षापूर्वी ह्रदय विकाराने मृत्यु झाला होता. ऐश्वर्याला वडिलांच्या विरहाचा ताण सहन न झाल्यामुळे तसेच बारावी सीईटी परीक्षेचा पेपर अवघड गेला असल्याकारणाने तिने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. ऐश्वर्याच्या मुळगावी तालूक्यातील म्हाळसापुर येथे शोकाकुल वातावरणात दुपारी साडे बाराच्या सुमारास तिच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक जे. जे. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार व्ही. बी. करे हे करीत अाहेत

Web Title: Selu News: Female Student commits suicide