उस्मानाबादमधील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

washi
washi

वाशी (उस्मानाबाद) : पारगाव (ता.वाशी) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी जि.प.सदस्य महादेव आखाडे व त्यांचे सहकारी बाजीराव डोके, आश्रुबा आखाडे यांच्यासह इतर काही समर्थकांनी आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 7) परांडा येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

आखाडे हे पारगावचा दहा वर्ष सरपंच होते. पारगावसह जिल्हा परिषद गटात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.त्यांनी भा.ज.पा.मध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पारगाव गटात मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपाला याचा मोठा फायदा होणार असल्याची चर्चा आहे.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सचिन इंगोले, भाजप नेते सुरेश कवडे नवनाथ मोटे डॉ. अनंत कुलकर्णी महादेव लोकरे लक्ष्मण अाटुळे अशोक जाधव, अण्णासाहेब गव्हाणे, प्रदीप ठाकूर, बासुमिया तांबोळी, लहूदास चव्हाण, दिलशाद शेख यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारगाव जिल्हा परिषद गट हा आ.राहुल मोटे यांचा बालेकिल्ला मानला जातो.मात्र मागिल जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणुकीत पारगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत शिवसेनेने या जागेवर ताबा मिळवलेला आहे.जिल्हा परिषदेच्या उमेदवारालाही विजयासाठी मोठी कसरत करावी लागली होती. या अगोदर पारगाव गटातीलच राष्ट्रवादीचे  पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मीकांत आटुळे माजी उपसरपंच डॉ. अनंत कुलकर्णी यांच्यासह काही कार्यकर्त्यानी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. बालेकिल्यातच कार्यकर्ते पक्ष सोडत असतील तर साहजिकच आ.मोटे यांना आगामी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत नागरीकांमधुन व्यक्त होत आहे.

आ. सुजितसिंह ठाकुर यांनी जिल्ह्यात केलेल्या विविध विकास कामामुळेच इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. आणखी काही दिवसात वाशी तालुक्यातील दाडंगा अनुभव व मोठा जनसंपर्क असलेले काही पदाधिकारी संपर्कात आहेत.त्यांचाही पक्ष प्रवेश कार्यक्रम लवकर घेण्यात येणार आहे.
- सचिन इंगोले, भाजपा तालुका अध्यक्ष वाशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com