esakal | परळी तालुक्यात मराठा आरक्षणासाठी साखळी धरणे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Dharna Andolan For Marathi Reservation

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेत या मुळ मागणीसाठी संपूर्ण समाज रस्त्यावर उतरलेला देशाने पाहिला.

परळी तालुक्यात मराठा आरक्षणासाठी साखळी धरणे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच

sakal_logo
By
प्रविण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेत या मुळ मागणीसाठी संपूर्ण समाज रस्त्यावर उतरलेला देशाने पाहिला. याची नोंद जागतिक स्तरावरही झाली, परंतु सरकार मराठ्याच्या मुळ आरक्षणाच्या मागणीला बगल देत असल्याचे दिसुन येत आहे, म्हणून आमचे आंदोलन कायम आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे सकल मराठा समाजाचे शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले आहे.


तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे गेल्या सहा दिवसांपासुन गावकरी साखळी धरणे आंदोलन करित आहेत. दादाहरी वडगावच्या अकरा विद्यार्थ्यांनी एसईबीसीच्या कोट्यातुन परीक्षा दिल्या. ते पात्र ही झाले. आॕर्डर ही मिळणार होत्या, परंतु आरक्षणाच्या स्थगितीमुळे हे पात्र विद्यार्थ्यांचे काय करायचे? असा सवाल गावकरी उपस्थित करित आहेत. आमचा मुळ प्रश्न मराठा आरक्षणाचा असताना वेळ काढूपणा करत राज्य सरकारने खऱ्या अर्थाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा रद्द करुन पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे.

स्मशानभूमी नसल्याने जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार; लातूर जिल्ह्यातील बावलगाव, उजळंबमधील स्थिती

पात्र ठरलेले अकरा विद्यार्थी सामान्य कुटुंबातील असुन काही विद्यार्थ्यांचे नोकरीसाठी लागणारे वय निघुन जात आहे. म्हणुन संपुर्ण गाव या साखळी धरणे आंदोलनात रात्रंदिवस सहभाग नोंदवत आहे. जोपर्यत आरक्षण मिळणार नाही तो पर्यत हे आंदोलन चालुच राहणार असल्याचे आंदोलकाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी शिवाजी शिंदे, भास्कर शिंदे, पद्मजा शिंदे, पूजा शिंदे, स्वाती आमले आदींनी आपली मनोगत व्यक्त केली.

संपादन - गणेश पिटेकर