भीतिदायक! प्लेगचे रुग्ण आढळलेल्या सळिंबा गावात पुन्हा पिसवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

उंदराच्या अंगावर होणाऱ्या पिसवांमुळे तालुक्यातील मामला आणि सळिंबा या ठिकाणी प्लेगचे रुग्ण आढळले होते. आणि त्यामुळेच वडवणी साऱ्या देशाला माहिती झाली होती. आज पुन्हा सळिंबा येथे पिसवा आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

वडवणी (बीड) - उंदराच्या अंगावर होणाऱ्या पिसवांमुळे तालुक्यातील मामला आणि सळिंबा या ठिकाणी प्लेगचे रुग्ण आढळले होते. आणि त्यामुळेच वडवणी साऱ्या देशाला माहिती झाली होती. आज पुन्हा सळिंबा येथे पिसवा आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

वडवणी तालुका हा बीड जिल्ह्यात मागासलेला तालुका म्हणून परिचित आहे. विकासाच्या बाबतीत नेहमी मागे. मात्र वडवणी तालुका निंर्मितीच्या आधी दोन खेडे गावांमुळे वडवणीच नाव पूर्ण देशाला माहिती झालं ते प्लेगमुळे.

मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

उंदराच्या अंगावर होणाऱ्या पिसवामुळे तालुक्यातील मामला आणि सळिंबा या ठिकाणी प्लेगचे रुग्ण आढळले होते. आणि त्यामुळेच वडवणी साऱ्या देशाला माहिती झाली होती. आज पुन्हा सळिंबा येथे पिसवा आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

सळिंबा येथील शेतकऱ्यांच्या घरी तसेच गोठ्यात उंदीर असल्याने या उंदरांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात पिसवा झालेल्या आहेत. घरात तसेच शिरकाव करून चावा घेतात. दिसून न आल्याने डास असतील असा भास होतो. मात्र बारकाईने पाहिल्यानंतर या पिसवा असल्याचे लक्षात आले.

भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि... 

काही दिवसांपूर्वी आम्ही आरोग्य विभागाचे एक पथक मामला आणि सळिंबा या ठिकाणी पाठवले होते. त्यावेळेस कुठेही निदर्शनास आले नाही. आता पिसवा झाल्या असतील तर त्याठिकाणी जाऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. 
- डॉ.एम बी घुबडे, आरोग्य अधिकारी, वडवणी

साधारण फवारणी करूनही काहीच उपयोग होत नसल्याने त्या अधिक प्रमाणात वाढत आहेत. यामुळे जनावरं तसेच माणसांना चावा घेतात. परिणामी प्लेगची पुनरावृत्ती होते की काय ही भीती येथील ग्रामस्थांमध्ये आहे. आरोग्य विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. 

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

पिंजरा गाडी बंद 

गेल्या तीन वर्षापर्यंत उंदीर पकडण्यासाठी आरोग्य विभागाकडून पिंजरे दिले जात होते. यासाठी एक पिंजरा गाडी येत होती. मात्र तीन वर्षांपासून ही पिंजरा गाडी येत नाही. त्यामुळेही गाडी परत सुरू करण्याची मागणी होत आहे. 

दोन महिने झाले घरात पिसवा चावत आहेत. आम्हाला वाटलं डास झाले असतील पण नंतर बघितल्यावर समजलं पिसवा आहेत. म्हणून त्यापूर्ण अंगावर मधमाशासारख्या बसतात आणि चावा घेतात. 
- महादेव चव्हाण, ग्रामस्थ, सळिंबा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serious Flea Bacteria Infections Found In Beed