निमित्त अधिवेशनाचे; शिक्षक गेले आपल्या गावी

गंगापूर - ‘सकाळ’ वर्तमानपत्रात शुक्रवारी (ता. एक) प्रसिद्ध झालेले वृत्त.
गंगापूर - ‘सकाळ’ वर्तमानपत्रात शुक्रवारी (ता. एक) प्रसिद्ध झालेले वृत्त.

गंगापूर - अधिवेशन काळात शाळेचे कामकाज सुरू राहील, अशी खातरजमा करूनच रजा मंजूर करण्यात याव्यात, असे शिक्षणाधिकारी सूरजकुमार जैस्वाल यांचे स्पष्ट आदेश असतानाही गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी  दुर्लक्ष करून केंद्रप्रमुखांवर जबाबदारी सोपविली. तालुक्‍यातील वीस शाळा शुक्रवारी (ता. एक), तर सोळा शाळा शनिवारी (ता. दोन) कायगाव केंद्रातील चार शाळा बंद होत्या. यात सावखेडा केंद्रातील सर्व १६ शाळा बंद असल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

याबाबत ‘सकाळ’मध्ये शुक्रवारी (ता. एक) वृत्त प्रकाशित झाले होते. अधिवेशनाच्या नावाखाली शिक्षकांनी गावाकडे जाणे पसंत केले असून अनेकांनी घरची कामे तर काहींनी पर्यटन करण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन पुणे येथे झाले. या अधिवेशनासाठी तालुक्‍यातील ५३४ शिक्षकांनी रजा टाकली होती. गुरुवारी (ता.२८) शिक्षक शाळेतून गायब झाले असून, शिक्षकांअभावी शाळांना टाळे ठोकावे लागले आहे.  

काही शाळांमध्ये एकाकी पाडलेल्या शिक्षकांकडून किती ज्ञानदान होणार हा संशोधनाचा विषय आहे. शिक्षक रजेवर गेल्यामुळे शिक्षण व्यवस्थाच कोलमडल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

संघटना उपस्थितींना देणार प्रमाणपत्रे 
जे शिक्षक अधिवेशनाला न जाता गावाला गेले, अशा शिक्षकांना नियमाने नैमितिक रजा मंजूर करण्यात येत नाही; परंतु संघटना कार्यकर्ते जपण्यासाठी अशांना उपस्थिती प्रमाणपत्र देत असते. त्या आधारावरच शिक्षकांना रजा मंजूर करण्यात येत असते.

शाळा बंद ठेवू नका असे स्पष्ट आदेश केंद्रप्रमुखांना दिले होते. तरीही तालुक्‍यातील वीस शाळा बंद होत्या. अशा सर्वच केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. कारवाई करणार आहे. 
- जयश्री चव्हाण, गटशिक्षणाधिकारी 

अडीच दिवस शिक्षकांची रजा होती. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षक रविवारी किंवा शनिवारी पूर्णवेळ शाळेत थांबून उरलेला अभ्यासक्रम पूर्ण करतील असे संघातर्फे पत्रक काढले आहे. 
- मधुकरराव वालतुरे, राज्य संपर्कप्रमुख, शिक्षक संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com